History, asked by hindavi82, 10 months ago

write about the पडक्या किल्ल्याचे मनोगत​

Answers

Answered by ItsShree44
3

⠀⠀⠀⠀⠀पडक्या किल्ल्याचे मनोगत

सुटीत एकदा आम्ही बाबांच्या मित्राच्या गावी गेलो होतो. त्या गावाच्या जवळच एक किल्ला होता. संध्याकाळी आम्ही बाबांबरोबर किल्ल्यावर गेलो. किल्ल्याची खूप पडझड झाली होती. तो जीर्ण झाला होता. ते पाहून मला खूप वाईट वाटले. तेव्हा किल्लाच माझ्याशी बोलू लागला.

किल्ला आपली माहिती सांगत होता- “शिवरायांच्या काळातच माझी निर्मिती झाली. शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात माझा खूप उपयोग झाला. काही काळ माझ्यावर यवनांचा अधिकार होता; तर काही काळ मी पोर्तुगीजांच्या अमलाखालीही गेलो होतो. स्वकीयांचा पराक्रम पाहून मी संतुष्ट झालो होतो.

"उन्हाळा, पावसाळा यांचा मारा सहन केल्यामुळे मी खिळखिळा झालो आहे. इतकेच नव्हे, तर काही प्रवासीही माझी नासधूस करतात. माझे उरलेले अवयवही त्यामुळे खिळखिळे होतात. आता काही सरकारी अधिकारी मला टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.” गडाकडूनच ही माहिती मिळाल्यामुळे आनंद झाला. भारलेल्या मनाने मी घरी परतलो.

Answered by akanshaagrwal23
9

please mark as brain list and follow me guys support me

Attachments:
Similar questions