Chemistry, asked by Anonymous, 10 months ago

write about the रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera) in marathi​

Answers

Answered by xShreex
6

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

1.हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले पाणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद्रांना 'ऑस्टीया' आणि 'ऑस्कुला' म्हणतात.

2. हेजलवासी प्राणी असून त्यातील बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात.

3. बहुतेक सर्व प्राण्यांचे शरीर असममित असते या प्राण्यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात.

5. हे प्राणी आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही. म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी (Sedentary animals) म्हणतात.

6. ह्यांच्या स्पंजासारख्या शरीरास कंटिकांचा/शुकिकांचा (Spicules) किंवा स्पाँजिनच्या तंतूचा आधार असतो. कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलीकाच्या बनलेल्या असतात.

7. ह्यांच्या शरीरात घेतल्या गेलेल्या पाण्यातील लहान सजीव व पोषकद्रव्याने ते भक्षण करतात. (ऑस्टीया' नावाच्या छिद्रांद्वारे पाणी शरीरात घेतले । जाते आणि 'ऑस्क्युला' नावाच्या छिद्रांद्वारे बाहेर सोडले जाते)

8. त्यांचे प्रजनर्स मुकुलायन या अलैंगिक पद्धतीने किंवा/आणि लैंगिक पदधतीने होते. याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते )

उदाहरण : सायकॉन, यूस्पाँजिया (आघोळीचा स्पंज), हायालोनिमा

Answered by varadad25
7

Answer:

रंध्रीय प्राणीसंघ:

Explanation:

१. या संघाच्या प्राण्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात.

२. हे बहुतेक सागरी प्राणी आहेत.

३. हे प्राणी नेहमी थरात जोडलेले असतात म्हणून ते प्रचलन दाखवत नाहीत.

४. हे प्राणी लैंगिक किंवा अलैंगिक पुनरुत्पादन दर्शवितात.

५. त्यांच्या शरीराची रचना पेशीस्तरावर असते. .

६. त्यांचे शरीर असममित आहे.

७. हे देहगुहाहीन प्राणी आहेत.

८. या प्राण्यांमध्ये विशेष प्रकारच्या पेशी असतात - कॉलर पेशी.

९. त्यांचे स्पंजयुक्त शरीर कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकापासून बनलेले असते.

उदाहरण: सायकॉन, हायलोनिमा, अंघोळीचा स्पंज, इत्यादी.

Similar questions