Hindi, asked by anju4044, 11 months ago

write about the सजीव आणि जीवनप्रक्रिया (Living organism and life processes)in marathi​

Answers

Answered by dildeepbhullar193
0

Explanation:

sorry i dont know Marathi....

Answered by xShreex
0

\large\boxed{\fcolorbox{blue}{yellow}{Answer:-}}

मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था यासोबतच शरीराचे अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी-अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. यासाठी यांना अखंडपणे ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे अन्नपदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्रोत असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा मिळविली जाते. ऊर्जानिर्मितीस फक्त अन्नघटकच लागतात असे नाही तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशींपर्यंत पोहोचतात. नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. म्हणजेच ऊर्जानिर्मितीसाठी प्रत्येक जीवनप्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठीही ऊर्जेची गरज भासतेच.

आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. वनस्पती स्वत:चे पोषण स्वत: करतात यासाठी ते अन्ननिर्मिती करतात. काही अन्न ते स्वत: वापरतात तर उर्वरीत अन्न फळे, पाने, खोड ,मूळ यांमध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो आणि त्यांपासून विविध पोषकद्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे मिळवतो. यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो?

दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यांसारखी धान्ये, मध, बटाटे. रताळी, मिठाई, यांमधून आपल्याला कर्बोदके मिळतात. कर्बोदकांमधून आपल्याला 4 Kcal/gm एवढी उर्जा मिळते.

Similar questions