Biology, asked by anju4044, 11 months ago

write about the विनॉक्सीश्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जानिर्मिती in Marathi ​

Answers

Answered by xShreex
12

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

विनॉक्सीश्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जानिर्मिती : काही सजीव ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाही. उदा. अनेक जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सीश्वसनाचा अवलंब करावा लागतो.

विनॉक्सीश्वसनाचे ग्लुकोज-विघटन (ग्लायकोलायसीस) आणि किण्वन (फरमेंटेशन) हे दोन टप्पे असतात, यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते.

या प्रक्रियेत ग्लुकोज-विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतरित केले जाते. यालाच किण्वन (Fermentation) म्हणतात.

काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सीश्वसनाचा अवलंब करतात...

उदा. बिजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनॉक्सीश्वसन करतात. तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी (स्नायू) विनॉक्सीश्वसन करतात त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते...

Similar questions