India Languages, asked by nannu9399, 11 months ago

Write an essay on environment and I in Marathi

Answers

Answered by halamadrid
1

◆◆पर्यावरण आणि मी ( environment and I)◆◆

मी म्हणजेच एक मनुष्य आणि पर्यावरण यांच्यामध्ये एक अनोखे नाते आहे. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकाचा उपयोग मनुष्य वेगवेगळ्या कामांसाठी, विविध क्षेत्रांमध्ये करतो.पर्यावरणाने मनुष्याची साथ प्राचीन काळापासून दिली आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्याची मदत केली आहे.

पाणी, हवा, जमीन, पशु, पक्षी, वनस्पति, कीटक हे सगळे पर्यावरणाचे वेगवेगळे घटक आहेत. या सगळ्यांचा प्रयोग मनुष्य स्वतःच्या हितासाठी तसेच समाजाच्या हितासाठी कित्येक वर्षांपासून करत आला आहे.

परंतु, मानवी कृतींमुळे तसेच पर्यावरणात मिळणाऱ्या वेगवेगळ्या संसाधनांचा अतिवापर केल्यामुळे या संसाधनांचा तुटवडा निर्माण झाला आहे , तसेच यामुळे पर्यावरणाचा तालमेल बिघडत चालला आहे.पर्यावरणाचा तालमेल बिघडल्यामुळे माणसाच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

पण, आपण माणसे हे विसरत चाललो आहोत की आपल्यासाठी पर्यावरण खूप महत्वपूर्ण आहे. पर्यावरणाशिवाय जगणे अशक्य आहे. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाला वाचवणे खूप आवश्यक आहे.

Similar questions