Write an essay on ganesh chaturthi in marathi.
Answers
Answered by
3

India
मराठी
शोधा
Home › Festivals
गणेश चतुर्थी : निराकाराची साकार रूपात अनुभुति. | information on ganesh chaturthi in marathi

श्री श्री रविशंकर :
असे म्हणतात की या चतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. श्रीगणेशाच्या या रुपामागे गहन अर्थ दडलेला आहे.
गणेश चतुर्थी - श्री श्री रविशंकर यांचा संदेश
आदिशंकराचार्यांनी याचा अर्थ फार सुंदर रितीने सांगितला आहे. श्रीगणेश जरी गजमुख म्हणून माहित असला तरी तो परब्रह्माचे रूप आहे. गणेशाचे वर्णन ‘अजम्, निर्विकल्पं, निराकार रूपम्’ असे केले जाते.
तो अजम् आहे म्हणजेच ज्याचा जन्म झाला नाही असा, तो निराकार आहे म्हणजेच आकार रहित आहे आणि निर्विकल्प म्हणजेच विकल्प नसलेला असा आहे. तो सर्वत्र असलेल्या चेतनेचे प्रतिक आहे. गणेशामुळेच हे ब्रह्मांड आहे. ज्याच्यामुळे सर्व गोष्टींना आकार मिळतो आणि अशी ऊर्जा आहे ज्यात सारे विश्व सामावलेले आहे. गणेश बाहेर मूर्तीत नसून तो आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. पण हे अतिशय सूक्ष्म ज्ञान आहे. प्रत्येक निराकार गोष्ट साकार रूप घेऊ शकत नाही हे आपल्या प्राचीन ऋषी मुनींना माहित होते. सामान्य जनतेला हे समजावे म्हणून त्यांनी त्या निराकार श्रीगणेशाला साकार रूप दिले. बराच काळ साकार रूपाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना निराकाराचा अनुभव येऊ लागतो.
अशाप्रकारे निराकार गणेशाला आदी शंकराचार्यांनी आपल्या प्रार्थनेतून आकार दिला आणि निराकार गणेशाचा संदेशही दिला. अशाप्रकारे आकार हाच आरंभीचा बिंदू आहे जो निराकार चेतनेपर्यंत पोहोचवतो.
hope this helps
pls mark as brainliest please please please please please
Answered by
5
essay on Ganesh chaturthi in Marathi is:
गणपती म्हटलं कि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, किती दिवस सुट्टी हे. शालेय विद्यार्थ्यासाठी गणपतीची सुट्टी म्हणजे पर्वणीच असते. पाऊस नुकताच संपलेला असतो, वातावरण अगदी प्रसन्न, हिरवेगार आणि आल्हाददायक असते. अश्या वातावरणात गणपती बाप्पांच्या आगमनाने सारे वातावरण बहरून येते. प्रत्येक जण आपल्या समस्या, भांडणे विसरून जातात. कळत नकळत सर्वांच्या चेहऱ्यावर एक तेज येत. किती बर होईल जर गणपती बाप्पा वर्षभर राहिले तर, सर्व किती मस्त असेल. गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये मंडप, मखर, पताका बनवण्याची तैयारी सुरु होते. घरातील लहानगी, मोठी अगदी उत्साहाने तयारीला लागतात. या वर्षी कसल्या प्रकारची सजावट करायची, कैलाश पर्वत, गड की आणखी वेगळं काही, ही चर्चा खूप मजेशीर असते. कोणी म्हणत पूर्ण मखर घरी बनवू, कोणी म्हणत बाजारातून विकत आणू. ही हुज्जत ही खूप छान असते. गणेशाच्या आगमनापूर्वी एक दोन दिवस सगळे घर, अंगण साफ करायला घेतात, घरातील सगळे अगदी उत्साहात यात भाग घेतात. कितीही दिवस अगोदर तयारी केली तरीही जी मजा शेवटच्या रात्री येते ती वेगळीच असते. मखर बनवणे, पताका चिकटवणे, दिवे, पणत्या, समई शोधून स्वच्छ करून ठेवणे, या सर्व धावपळीत ही खूप मजा येते. नातेवाईक सुट्ट्या काढून घरी येतात, आपले चुलत, मावस, आत्ते भाऊ, बहिणी येतात. लहानगी तर कल्ला करतात. मोठयांच्या गप्पा-टप्पा, छोट्यांच्या खोड्या आणि खेळांनी घर, आंगण अगदी प्रसन्न होऊन जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी सगळे लवकर उठतात, फटाफट स्नान करून नवीन कपडे परिधान करतात.आई,आजी प्रसाद, नैवद्य आणि मोदकांच्या तयारीसाठी लागतात. बाबा आणि आम्ही सारी लहानगी गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जातो. नाचत-वाजवत आम्ही गणपती बाप्पाला घरी घेऊन येतो. अंगणात आल्यावर आई पूजा करते, आरती करते आणि मग गणेश भगवान आपल्या सिंहासनावर आरूढ होतात. थोड्या वेळाने आरती होते, ढोलकी, टाळ, टाळ्यांच्या आवाजाने घर दूम- दूमून जाते. मोदकांचा नैवद्य दाखवला जातो, आरती फिरवली जाते, प्रसाद वाटला जातो. त्यादिवशी दुपारी सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. कोणाच्या घरी गणपती बाप्पा दिड दिवस तर कोणाकडे ५, ७ किंवा १० दिवस वास करतात. गणपती बाप्पांसोबत त्यांच्या मातोश्री, गौरी सुद्धा येतात. घरातील स्त्रिया खूप भक्ती भावाने गौरीचे व्रत आणि पूजा करतात. बघता बघता गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस उजाडतो. सर्वांनाच माहीत असते की हा दिवस येणार तरीही मन उदास होते. विसर्जनाच्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. गणेशोत्सव माझा आवडता सण आहे कारण या सणात सर्व घराचे, समाजाचे सदस्य एकत्र येतात. आपले वाद-विवाद, रुसवे-फुगवे विसरून एकत्र गणपतीचा सण साजरा करतात. विविध धर्माचे लोक सुद्धा धार्मिक सीमा पार करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतात. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा सण चालू केला त्याचे फळ आपण आज पाहू शकतो. भारतात नाना प्रकारचे धर्म,जाती आणि वाद आहेत. देशाच्या उन्नतीसाठी हे सगळे एकत्र आणि आनंदात राहणे खूप गरजेचे आहे. गणेशोत्सव हा सण माझा आवडता सण आहे कारण हा सण घरच्यांना, समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. सूचना: आजकाल गणपती सणामध्ये खूप भानगडी सुद्धा होतात, राजकारणी लोक याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करतात. इको फ्रेंडली गणपती, या सणामध्ये होणारे प्रदूषण, राजकारण, सार्वजनिक मंडळांची अरेरावी असे विवाद, समस्यासुद्धा आहेत, आणि त्या खऱ्या सुद्धा आहेत. पण या निबंध किंवा भाषणांमध्ये आम्ही या सणाच्या सकारात्मक गोष्टींवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे.

hs26102005:
please mark my answer as BRAINLIAST
Similar questions