write an essay on rani Laxmi bai in Marathi of 100 to 150 words
Answers
Answer:
Here is your answer.
Explanation:
Hope this will help you.
Answer:
Explanation: रानी लक्ष्मीबाई
झाशीची राणी यांचा जन्म झाँसी येथे 19 नोव्हेंबर १८२८ मध्ये झाला होता. रानी लक्ष्मीबाई यांचे जीवन देश स्वतंत्रता साठी बलिदान केले. रानी लक्ष्मी बाई स्रियाँ चे प्रेरणा स्थान आहे.लक्ष्मी बाई च्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे ,आई भागीरथी असे होते.
रानी लक्ष्मीबाईचे खरे नाव मणिकर्णिका असे होते. मनुताई तीन-चार वर्षांची असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यानंतर दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयाला गेले.
राजवाड्यातील नानासाहेब पेशवे यांच्या बरोबर राहून म्हणता युद्धकलेचे शिक्षण घेऊ लागल्या तलवार ,भाला ,गोळाफेक ,तीर कमान चालवणे बंदुक चालवणे घोडेस्वार होणे अशा प्रकारचे शिक्षण घेऊ लागल्या मनुताई अत्यंत हुशार होते सर्व प्रकारचे युद्धकलेचे शिक्षण त्यांनी घेतले व लेखन व वाचना च्या कलेत निपुण झाल्या.
मनुताई च्या विवाह झाशी चे महाराज गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला.विवाह झाल्यानंतर त्याचे महाराज गंगाधर नेवाळकर यांनी म्हणून त्याचे विश्लषण, तल्लख बुध्दि व तत्परता पाहुन त्यांचे नाव लक्ष्मणा ठेवले. सर्व जन त्यांना लक्ष्मबाई म्हणून संबोधित करू लागले.
रानी लक्ष्मीबाई यांनी झाशी वर आलेल्या सर्व संकटांचा सामना करून जनतेच्या सर्व समस्या सोडवल्या.त्यामुळे लक्ष्मीबाई जनतेमध्ये खूप प्रख्यात झाल्या .लक्ष्मीबाई यांना लहानपणापासूनच इंग्रजांविरुद्ध अतिशय चीड होती.
स्वातंत्र्य ते साठी क्रांतिकारी विचार सरनी ची सुरुवात बालपणा पासुनच केली होती.
एका महारानी गरिमा, भारत मातेला ब्रिटिश साम्राज्य पासुन मुक्त करण्याची स्वन्प साकार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांना अनेक अडचनी आल्या. वैयक्तिक, सांसारिक अनेक प्रकार च्या संकटांवर मात करून आपले क्रांतिकारी विचार सर्वत्र रोवले. मंगल पांडे सारख्या क्रांतिकारी यांची मदत केली.
इसवी सन 1851 मध्ये राणी लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला.झाशी ला वारस मिळाला म्हणून सर्वत्र प्रजे मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले .आपल्या गादीला वारस मिळाल्याने गंगाधरराव खूप खूप खुश होते .काळाच्या ओघाने दोन-तीन महिन्यातच बाळा चा मृत्यु झाला.
पुत्र वियोगाचे दुखः गंगाधर रावांना सहन झाले नाही त्यामुळे काही दिवसांनी त्यांचे दु:खद निधन झाले.गादीला वारस म्हणून त्यांच्या घराण्यातील मुलाला दत्तक घेतले .त्याचे नाव आनंदराव नेवाळकर होते.दत्तक विधानानंतर त्याचे नाव दामोदरराव ठेवण्याची आले. लक्ष्मी बाई वर एकामागून एक संकट आली. पुत्र वियोगानंतर वयाच्या 1८ व्या. वर्षी वैधव्य प्राप्त झाले.
इंग्रजांनी डावपेचांनी झाशी ताब्यात घेतली व ब्रिटिशांनी झाशीच्या प्रजेवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. अन्यायामुळे लक्ष्मीबाई वाघिणी प्रमाणे चवताळून उठली आणि घोषणा केली "में मेरी झाशी नही दूँगी ."अशाप्रकारे संभाव्य हल्ल्यापासून झाशी चे संरक्षण करीत राहिल्या.
ब्रिटिशांनी लक्ष्मीबाई ला जिवंत पकडण्यासाठी सेनापती ह्यू रोज यांची नेमणूक केली. ह्यु रोज ने झाशी जवळ झावनी लावली. त्यांच्या सैन्याने लक्ष्मीबाई ला निरोप पाठविला शरण येण्यासाठी.पण लक्ष्मी बाई तटस्थ राहील्या.शरणागती न पत्करता आपल्या पुत्राला पाठीवर बांधून लढाई करत राहिल्या .त्यांनी एका क्षत्रिय राणी प्रमाणे असामान्यपणे ब्रिटिशांना चकित केले.अशा असामान्य स्त्रीची चरित्र महिलांना प्रेरणा देणारे आहे .त्यांच्या क्रांतीकारी विचारांना संपूर्ण भारतातील क्रांतिकारी कार्य ही प्रेरणा मिळाली,स्वातंत्र्याची संपूर्ण स्वाधीनतेची.लक्ष्मीबाई यांनी एखाद्या रणचंडी के प्रमाणे ब्रिटिशांविरुद्ध अनेक संग्राम केले.
देश स्वातंत्र्य संग्रामात लक्ष्मीबाई यांनी आपले बलिदान दिले.म्हणतात ना "खूब लडी़ मर्दानी, झाशीवाली राणी ".आजच्या आधुनिक युगातही राणी लक्ष्मीबाई स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे.स्त्री हे माता, पत्नी, भगिनी प्रमाणेच वेळ आली तर दृष्टांचा संहार करणारी माँ दुर्गा चे स्वरूप आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षीं मरण स्वीकारले. त्या शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
तर मित्रांनो हा होता रानी लक्ष्मीबाई निबंध मराठी , Rani Lakshmi Bai Essay in Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.