write essay on "आई संपावर गेली तर " .....
Answers
Answered by
5
here is your essay on aye sampaavr geli tar
Attachments:
abhinav19102004:
where did you find this essay
Answered by
4
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀आई संपावर गेली तर...
आमच्या घरात सगळे आळशी बनले आहेत. एकटी आईच सर्व कामे करते. आई आमच्यावर रोज रागावते. पण कोणीही आपापली कामे करत नाही. एकदा आई खूप चिडली आणि म्हणाली, “मी आता संपावरच जाणार!"
बापरे, आई संपावर गेली तर... तर सकाळी लवकर कोण उठवणार? गरम गरम नाश्ता कोण देणार? दप्तर कोण भरून देणार? शाळेतून आल्यावर जेवण कोण देणार? गृहपाठात मदत कोण करणार? प्रकल्प तयार करण्यास, स्पर्धेचे भाषण तयार करून देण्यास कोण मदत करणार? वाढदिवसाचा सुंदर केक कोण बनवणार?
घरातील वस्तू नीटनेटक्या कोण ठेवणार? बाबांना तर त्यांची प्रत्येक वस्तू हातात आणून दयावी लागते. मग आई संपावर गेली तर...? तर बाबांचे तरी कसे होणार? मी बाबांना खूण केली, “आपण आईचे ऐकू या. ती सांगते ते योग्यच आहे. आपण आपली कामे स्वत:च करू या."
Similar questions