write essay on 'if schools were closed' in Marathi
Answers
Answer:
प्रत्येक लहान मुलाच्या मनात 'शाळा बंद झाली तर' हा विचार कधी ना कधी आलाच असेल.
खरच शाळा बंद झाली तर,तर काय मज्जाच मजा!रोज सकाळी लवकर उठायला लागणार नाही,अभ्यास करावा लागणार नाही,परीक्षा द्यायला लागणार नाहीत,अभ्यास नाही केला म्हणून आपले आई वडील किंवा शिक्षकांच्या ओरडा खायला लागणार नाहीत.आपल्याला पाहिजे तोपर्यंत आपन खेळू शकू, पाहिजे तेव्हा झोपायचं आणि उठायचं. खरच जीवन किती सोपं आणि आरामदायक होऊन जाईल.
पण शाळा बंद झाली तर,आपल्याला आपले मित्र मैत्रीणी भेटणार नही.त्यांच्यबरोबर गप्पा मारता येणार नही,खेळता येणार नाही. आपल्याला शिकता येणार नाही.शिकलो नाही, तर पुढे काय होईल,आपल्याला चांगली नोकरी मिळणार नाही व आपले जीवन व्यर्थ होईल.शाळेतील सहली,क्रीडास्पर्धा, बक्षीस समारंभ, या सारख्या गोष्टी अनुभवता येणार नाही.
शाळा एखाद्याचे व्यक्तिमत्व घडवण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावते. आपल्याला योग्य शिक्षण प्रदान करते व जीवनातील पुढील वाटचालीसाठी तयार करते.प्रत्येकाच्या जीवनात शाळेचे महत्वपूर्ण स्थान असते. म्हणून शाळा बंद झाली तर, हा विचारच आपण मनातून काढला पाहिजे.
Explanation: