Hindi, asked by shca74, 5 months ago

Write essay on in marathi: निसर्ग माझा मित्र

Answers

Answered by janhavi0444
9

Answer:

प्रस्तावना:

आपण सर्वजण हिरव्यागार रंगाने भरलेल्या स्वच्छ आणि सुंदर निसर्ग असलेल्या ग्रहावर राहतो. पृथ्वी हा एक ऐसा ग्रह आहे ज्यावर मानवाला आपले जीवन जगण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध आहेत. निसर्ग हा मानवाचा चांगला मित्र आहे.

कारण आम्हा सर्व सजीवांना राहण्यासाठी सर्व संसाधने उपलब्ध करून देतो. म्हणून मानव आणि निसर्ग यांचे अतूट संबंध आहे. या निसर्गातून मानवाला भरपूर काही मिळत. पण त्या बदल्यात निसर्ग मानवाकडे कधीच काही मागत नाही.

निसर्ग म्हणजे काय –

निसर्ग म्हणजे सृष्टी होय. हि सृष्टी पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश या पांच तत्त्वांनी बनलेली आहे. निसर्ग आणि मानव यांचे नाते हे जन्मापासूनचे आहे. कारण याच पांच तत्त्वातून मानवाचा जन्म झाला आहे.

आपण सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे आणि पोषण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

निसर्ग आणि मानव

या निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच मानवाला निसर्गातून शुद्ध हवा मिळते. झाडांपासून मानवाला आपले जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो.

हा निसर्ग आम्हा सर्वाना पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा आणि आमच्या इतर उपयोगांसाठी वनस्पती देतो.

निसर्ग माझा मित्र

निसर्ग हाच आपला गुरु, आपला मित्र आणि आपला डॉक्टर सुद्धा आहे. या निसर्गाकडून आपणास भरपूर काही शिकायला मिळते.

जस फुल काट्यात फुलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहावे, झाडांप्रमाणे नेहमी खंबीरपणे उभ राहून दुसऱ्यांना सहायता करणे, नदीच्या समोर जसे अनेक अडथळे आले तरी ती वाहत असते.

त्याचप्रमाणे आपण सर्वानी कष्टांना न घाबरता सामोरे जाणे आवश्यक आहे. हे सर्व निसर्ग आपल्याला शिकवतो.

Answered by akshitsinghin
2

Answer:

प्रस्तावना:

परमेश्वराने या निसर्गाला भरपूर सुंदर प्रकारे बनविल आहे. पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर मनुष्य जीवन आहे.

या पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथे असणारे वातावरण आणि निसर्ग. निसर्ग आणि मनुष्य या दोघांचा भरपूर जुना संबंध आहे. या निसर्गातून मनुष्याला विविध प्रकारची वस्तू प्राप्त होते.

हा निसर्ग मनुष्याला भरपूर काही देतो पण त्या बदल्यात मनुष्याशी काहीही मागत नाही. या निसर्गाशिवाय मनुष्य अपना जीवन नाही जगू शकत.

निसर्ग म्हणजे काय –

निसर्ग म्हणजे सृष्टी, पाणी, पृथ्वी, अग्नी, वायू, आकाश या पांच तत्वांनी बनलेली सृष्ह्ती म्हणजे निसर्ग होय. मनुष्याचा जन्म या पांच तत्वातूनच झाला आहे. आम्ही सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीनही होतो.

निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी

या निसर्गातून मनुष्याला जीवन जगण्यासाठी शुद्ध हवा मिळते. तसेच त्याला निसर्गातून फुले, फळे, भाज्या इ. वस्तू प्राप्त होतात. म्हणून हा निसर्ग दानशूर आहे. निसर्ग हा बोलत नाही पण कृती करतो.

मनुष्य या निसर्गाच्या अंगाखांद्यावर प्रगत होऊ लागला. त्याने अवजारे बनवली. दगडावर दगड घासून आगीचा शोध लावला.

तसेच मानवाने चाकाचा शोध लावला.

यामुळे मानवाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. मनुष्य दगडाच्या मदतीने शिकार करू लागला आणि आगीच्या मदतीने शिकार शिजून खायला लागला.

Hope it will help you

Thank you

Plz mark me brainlist and follow me plz

Hope you get more and more followers

Similar questions