Write Essay On माझे आवडते शहर - मुबंई
Answers
Explanation:
आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची मुबंई माझे शहर मराठी निबंध बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
अलीकडे असा एकही दिवस उगवत नाही की, वर्तमानपत्रांत काही ना काही निमित्ताने मुंबईच्या गर्दीचा उल्लेख नाही. हाशहुश्श करीत आणि माणसांच्या गर्दीला शिव्याशाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबईतच राहत असतो. मुंबईच्या गर्दीबद्दलची चर्चा जेवढी गर्जत असते, तेवढेच मुंबईत येणारे माणसांचे लोंढेही सतत वाढत असतात आणि हे सारे पाहून 'आमची मुंबापुरी' मात्र गालातल्या गालात हसत असते.
नाहीतरी या मुंबापुरीचं सारंच आगळंवेगळं. अगदी चिचोळ्या आकाराची ही लहान सात बेटे. सभोवताली सारं खारं पाणी. माडाच्या आणि ताडाच्या वाड्यांनी भरलेली आणि ताज्या म्हावऱ्याच्या वासाने दरवळलेली ही बेटे कुणी राजाने आपल्या लेकीला आंदण दिली आणि जावयाने ती व्यापारी कंपनीला विकून टाकली. त्याचक्षणी या बेटांचे भाग्य उजळले. अशी हिची मजेशीर दंतकथा आहे.