write essay on rainy season in marathi
Answers
Answer:
पावसाळा चालू झाला की आई घरामध्ये गरम चहा आणि भजी बनवायला घ्यायची आणि गरम गरम चहा भजी आम्हाला खाण्यास द्यायची, तेव्हा आम्ही घरातले सर्वजण आईच्या हाताच्या चवीचा आनंद त्या रिमझिम पडणार्या पाउसामध्ये घेत असायचो. आईच्या हाताला चव असल्यामुळे पावसाळ्यामध्ये चहा आणि भजी पण खूप स्वादिष्ट लागायचे.
शेतकऱ्यांसाठी पाऊस हा खूप मोठा महत्वाचा घटक आहे. शेतकरी पिकवतात म्हणून आपण खाऊ शकतो म्हणून पाण्याशिवाय काहीच नाही. पाउस आला की आम्ही सर्व मुले तर नुसती पावसामध्ये भिजत असतो. घरी जाऊन आईचा ओरडा खातो पण तरीही मौज मस्ती चालुच असते. मला पावसाळा खूप आवडतो. सगळीकडे झाडे हिरव्या रंगांनी लाल निळ्या पांढर्या फुलांनी भरलेली असतात.
शेतकऱ्यांसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असते. पाऊस झाला की शेतीमध्ये पाणी खूप यायचे. पाऊस पडला की शेतकर्यांना खूप आनंद होई. पाऊस झाला की झाडांना वेलींना पालव्या फुटतात आणि सगळीकडे नुसती हिरवळ पसरते. सगळीकडे पूर्णपणे हिरवळ आलेली असते.
pavsala marathi nibandh
पाऊस झाला की शेतामध्ये फिरावयास जाण्याची मज्जाच काही और असते, सगळीकडे पाणीच पाणी साठलेले असते. नाले, तलाव, डबके, आणि ओढे अगदी तुडुंब पाण्याने भरलेली असतात. पाण्याने भरलेल्या डबक्यामध्ये छोट छोटे दगड टाकायला खूप मज्जा येते आणि पाण्यात टाकलेल्या दगडामुळे पाण्यात तयार होणारी गोल वलये खूप छान दिसतात.
आंब्याची झाडे बहरतात काही फळ झाडांना तर पाड लागायला सुरुवात होते. शेतकऱ्यांची पावसामुळे चांदी होते. काही भागांमध्ये तेथील हवामानाला पुरक अशी पिके पाऊसाळ्या मध्ये घेतली जातात, जास्त पाउसाच्या भागामध्ये भात लावणी, उस लावणी केली जाते, बाग लावणी, फळ झाडे लावणी अशी अनेक निरनिराळी पिके लावली जातात.
सगळीकडे हिरवळ असते, मन प्रसन्न वाटत असते. पाऊस आला की आम्ही गाणी म्हणतो, अंताक्षरी खेळतो, पावसामध्ये नाचत असतो, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतो.
तो पावसाळा संपला की आम्हाला खूप पावसाची आठवण येते म्हणून आम्ही मोठ्या आनंदाने म्हणतो, “तू येरे येरे पावसा तुला देतो पैसा!” “पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा!”
Hope it Helps !!
here is your essay on rainy season
if u like it plss mark it brainliest answer