write in konkani about my school for class 3
Answers
Explanation:
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठे योगदान असते ती म्हणजे – शाळा. मानवाकडे जन्मापासून विशेष कला असते. परंतु या पृथ्वीवर आल्यानंतरच त्याला कोणत्याही प्रकारचे विशेष ज्ञान मिळते.
आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला घडविण्यात तीन गोष्टींचा खूप मोठा वाटा असतो. तो म्हणजे – एक आई, दुसरं म्हणजे आपला परिसर आणि तिसरं म्हणजे आपली शाळा.
आपण सर्वजण जास्तीत -जास्त वेळ हा शाळेतच घालवतो. आपल्या शाळेवर आपले आई – वडील एक मोठी जबाबदारी टाकतात. शाळा ही एक व्यक्ती आणि एक राष्ट्र घडविण्यात खूप मोठी भूमिका बजावते.
माझी शाळा
माझ्या शाळेचे नाव शारदा विद्यालय असे आहे. माझी शाळा खूप छान आहे आणि हि तीन मजली इमारत आहे. माझी शाळा शहराच्या मध्यभागी स्थित आहे.
माझी शाळा माझ्या घरापासून ३ किमी अंतरावर आहे. मी नेहमी बसमधून शाळेत जातो. माझ्या शहरात जेवढ्या शाळा आहेत.
त्या सर्व शाळांपैकी माझी शाळा सर्वोत्तम आहे. माझ्या शाळेच्या आजूबाजूला प्रदूषण, आवाज आणि धूळ न करता अतिशय शांत ठिकाणी स्थित आहे.
माझ्या शाळेमध्ये १ ली ७ वी पर्यंत वर्ग आहेत. तसेच एक वाचनालय आणि खेळण्यासाठी मोठे मैदान आहे.
ग्रंथालय (वाचनालय)
माझ्या शाळेत एक खूप मोठे ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात अन्य प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेतील सर्व मुले तिथे जाऊन वाचण्यासाठी पुस्तके घेतात. तसेच त्या ग्रंथालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य सुद्धा आहे.
सुंदर बाग
माझ्या शाळेच्या समोर एक सुंदर बाग आहे आणि तिथे एक छोटेसे तलाव सुद्धा आहे. त्यामध्ये बरेच मासे आणि बेडूक सुद्धा राहतात. त्या बागेमध्ये रंगीबिरंगी फुले, शोभेची झाडे, हिरवेगार गवत सुद्धा आहे.
ज्यावेळी या बागेमध्ये रंगीबिरंगी फुलांच्या झाडावर फुले उमलतात तेव्हा हि बाग अत्यंत सुंदर दिसते. या सुंदर बागेमुळे माझ्या शाळेची सुंदरता अजून वाढते.