CBSE BOARD X, asked by bhumikasmart22, 1 year ago

Write Marathi essay on :
क्रीडा दिन
Pls pls answer fast it's urgent......

Answers

Answered by savitadabholkar81
1

Answer:

I am also marathi but don't know how to write marathi

sorry

Answered by s242
0

Answer:

Explanation:खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन जगभरातील देश आपापला राष्ट्रीय क्रीडा दिन हा इतिहास आणि तिथीनुसार वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात. देशातील क्रीडा समिती ही क्रीडादिन साजरा करण्याचे नियोजन करत असते. भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन हा दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या दिवशी सर्वच वयोगटातील नागरिक, खेळाडू क्रीडा स्पर्धेत, उपक्रमात सहभाग घेतात. मॅराथॉन, कबड्डी, बॉस्केटबॉल, हॉकी आदी खेळांत सहभागी होऊन क्रीडा दिनाला बळकटी देतात. हा दिवस केवळ मनोरंजन म्हणून साजरा केला जात नाही, तर मानवी आयुष्यातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रीडा दिनाच्या निमित्ताने युवा पिढीतील क्रीडाकौशल्य, प्रतिभा शोधण्याचेही काम केले जाते. यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून तरुणांना संधी उपलब्ध करून दिली जाते.

भारतात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास हा 29 ऑगस्ट 1905 शी जोडला गेलेला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यात जन्मलेल्या ध्यानचंद नामक एका मुलाने हॉकी खेळाच्या माध्यमातून इतिहास घडवला. त्यांनी 1928, 1932, 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये हॉकीत सुवर्णपदक जिंकून दिले. ध्यानचंद यांना हॉकीमध्ये जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून मानले जाते. ध्यानचंद यांच्यामुळे पारतंत्र्यात असलेल्या देशाचे नाव जगाच्या पाठीवर उंचावले. त्यांचा हॉकीच्या मैदानावरील खेळ अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारा असायचा. चेंडूवरील त्यांचे नियंत्रण पाहून प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूदेखील दंग व्हायचे. या कौशल्याने त्यांना ‘विझार्ड’देखील म्हटले जाते. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरदरम्यान त्यांनी 400 हून अधिक गोल केले. त्यांच्या असामान्य कामगिरीबद्धल भारत सरकारने त्यांना 1956 रोजी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले. हॉकीमध्ये भारताला सोनेरी दिवस मिळवून देणार्‍या या महान खेळाडूच्या स्मरणार्थ 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

राष्ट्रीय क्रीडा दिनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस केवळ आनंदोत्सव साजरा करण्यापुरताच मर्यादित नाही, तर देशभरात क्रीडाविषयी भावना अधिक जागृत करणे हादेखील उद्देश आहे. युवकांचे खेळाकडे अधिकाधिक लक्ष वेधणे या द‍ृष्टीने क्रीडा दिनाचे आयोजन केले जाते. उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा संस्कृती, परंपरा माहीत व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध प्रकारचे खेळ आणि कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो.

यंदाच्या क्रीडा दिनाला पार्श्‍वभूमी आहे, ती एशियन गेम्सची. या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत क्रिकेट वगळता अन्य क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी वैयक्‍तिक अथवा सांघिक यश भरपूर मिळवले आहे; मात्र आपण क्रिकेटच्या पलीकडे जाऊन विचारच करत नाहीत किंवा करू इच्छित नाहीत. अन्य खेळांत कितीही दमदार यश मिळवले तरी त्याचा फारसा आनंदोत्सव साजरा केला जात नाही, हे वर्षानुवर्षांपासूनचे वास्तव आहे. यावरून आपल्याकडे क्रीडा भावना अजूनही मुळापर्यंत पोचलेल्या दिसून येत नाहीत. केवळ सरकारी औपचारिकता म्हणून क्रीडा दिन साजरे होत असावेत, अशी शक्यता यानिमित्ताने व्यक्‍त केली जात आहे. जगभरात असे अनेक देश आहेत की, ते आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा पुरवू शकत नाहीत; मात्र ते त्यांना सर्वश्रेष्ठ पाठिंबा देतात आणि मार्गदर्शन करतात. भारतातही अशाच मार्गदर्शनाची आणि प्रशिक्षणाची गरज आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व प्रत्यक्षात उतरण्यासाठी अधिकाधिक रचनात्मक पद्धतीवर क्रीडा धोरणाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भारतात प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही; पण त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ मिळाले, तर चीनसारख्या देशांप्रमाणे आपणही जागतिक स्तरावरच्या आघाडीच्या स्पर्धांमध्ये अग्रगण्य असणार्‍या पहिल्या पाच देशांमध्ये समाविष्ट होऊ शकतो.

Similar questions