write on essye of माझा आवडता प्राणी- हत्ती in marathi
Answers
माझा आवडता प्राणी- हत्ती
मला सर्व प्राण्यांमध्ये भारदस्त हत्तीच खूप आवडतो!
माझा हा आवडता प्राणी मला कोठे कोठे भेटतो? कधी सर्कसमध्ये, तर कधी प्राणिसंग्रहालयात, तर कधी चित्रांत. कधी कधी रस्त्यावर एखादया मालाची जाहिरात करताना दिसतो. कधी एखादया मिरवणुकीत. दिमाखाने मिरवताना दिसतो.
पूर्वी गजराजाचे स्थान राजवाड्याच्या वा श्रीमंत सरदारांच्या माहूतखान्यात असे. आजही दक्षिण भारतातील अनेक मंदिरांतून हे गजराज देवाच्या सेवेसाठी उपस्थित असतात. म्हैसूरच्या दसऱ्याच्या मिरवणुकीत असे अनेक गजराज वैभवाने मिरवत असतात.
मला हत्ती हा प्राणी विशेष आवडतो तो त्याच्या अवाढव्य देहयष्टीमुळे आणि तितक्याच तल्लख बुद्धिमत्तेमुळे. हत्ती हा पूर्ण शाकाहारी आहे. गवत आणि ऊस हे त्याचे अन्न. पाण्यात डुंबणे आणि आपल्या सहकाऱ्यांसह पाण्यात खेळणे त्याला खूप आवडते. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. हा वनातील प्राणी अनेक कामांत माणसांचा मित्र झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या दातांना खुप मागणी असते. असा सदैव आपल्याला उपयोगी पडणारा हा प्राणी मला खूप आवडतो.