write story on this topic in Marathi
Answers
*गर्वाचे घर खाली*
एका गावात एक नदी असते. दुसऱ्या गावात जाण्यासाठी लोकांना ती नदी पार करायला लागत असे. त्या नदीकाठी नारू नावाचा माणूस होडी घेऊन सगळ्यांना नदी पार करून देत असे.
एके दिवशी नारूच्या होडीत एक माणूस बसला. दिसायला तो माणूस सुशिक्षित दिसत होता. त्याचा हातात पोथी होत्या. त्या माणसाने नारूला विचारले, " काय रे, तुला वाचता येते का?"
नारू अशिक्षित असल्यामुळे त्याने नाही म्हंटले.
तो माणूस हसून म्हणाला, " तुझे निम्मे आयुष्य वाया गेले आहे."
नारू गप्प असून आपली होडी चालवत होता.
थोड्या वेळाने त्या माणसाने परत नारूला विचारले, " काय रे? तुला संस्कृत तरी येतं का?"
"नाही." नारू म्हणाला.
तो माणूस पुन्हा हसून म्हणाला, " तुझे निम्मे आयुष्य वाया गेले आहे."
तेवढ्यात वारा जोराने वाहू लागला आणि पाऊस सुरु झाला. त्या वाऱ्याने वादळाचे रूप घेतले. होडी जोरात हलू लागली.
नारूने त्या माणसाला विचारले, काय हो, तुम्हाला पोहता येतं का?
तो माणूस नाही म्हणाला.
नारू हसून म्हणाला," तुमचं तर सगळं आयुष्यच वाया गेलंय." आणि पाण्यात उडी मारली.
त्या माणसाने गर्वाचे पायी आपले प्राण गमावले.