History, asked by hindavi82, 10 months ago

write the essay on the सूर्य उगवला नाही तर...​

Answers

Answered by ItsShree44
7

⠀⠀⠀⠀⠀⠀⠀ सूर्य उगवला नाही तर...

सर्य उगवला नाही, तर? वा! किती मजा येईल! रात्र संपणारच नाही. मग खूप वेळ दरदर्शनचे कार्यक्रम पाहता येतील. लवकर झोपावे लागणार नाही. लवकर उठण्याची कटकट नसेल. गृहपाठ पूर्ण करण्याची गरज नसेल. शाळेत जावे लागणार नाही. सगळी मज्जाच मजा होईल.

मात्र, सूर्य खरोखरच उगवला नाही, तर...? तर खूप तोटा होईल. आपण सूर्योदयाचा व सूर्यास्ताचा देखावा पाहू शकणार नाही. कधी कधी आकाश किती रंगीबेरंगी झालेले असते! हे दृश्य मग कधीच दिसणार नाही. सगळीकडे काळोखच असेल, मग कुठेच जाता येणार नाही. काही पाहता येणार नाही. शाळा नसेल आणि मित्रही नसतील!

एवढेच कशाला? सूर्य नसला, तर वनस्पती कर्बग्रहणाची क्रिया करू शकणार नाहीत. म्हणजे वनस्पती नसतील. मग आपल्याला अन्न कुठून मिळेल? सूर्य नसला, तर ढग नसतील. पाऊस नसेल. आपल्याला पाणी मिळणार नाही. मग आपण जगणार कसे? खरे म्हणजे सूर्य नसेल, तर पृथ्वी निर्जीव होईल. बाप रे! छे, छे! सूर्य हवाच! तो उगवलाच पाहिजे!

Similar questions