write the essay on the थंडीतील सकाळ in Marathi short paragraph
Answers
थंडीतील सकाळ
उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तीन ऋतूमध्ये मला हिवाळा हा ऋत खप आवडतो. या ऋतूत उन्हाळ्यातील दाहकता व घामाचा चिकचिकाट नसतो. पावसाळ्यातील चिखल नसतो. सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. हिवाळ्यातील सकाळ तर खूप सुखद असते.
आमच्या गावाकडील हिवाळ्यातील सकाळ मला खूप आवडते. सर्वत्र धुकेच धुके पसरलेले असते. दूरवर डोंगराचे फक्त सुळके दिसतात, अधूनमधून झाडांचे शेंडे दिसतात. देवळाचा कळसच तेवढा चमकत असतो. सर्वत्र पानांचा सडा पडलेला असतो. पानांवर, गवतावर सर्वत्र दव पडलेले असते. अशा वेळी रानातून हिंडताना खूप खूप मजा येते.
काहीजण शाल पांघरून फेरफटका मारतात. मुले रंगीबेरंगी स्वेटर घालून मजेत शाळेत जात असतात. मला कधी कधी जाडजूड पांघरूण घेऊन अंथरुणात लोळत राहावे, असे वाटते.
अशी ही थंडीतील प्रसन्न सकाळ वर्षभर हवी!
Answer:
मुख्यपृष्ठवर्णनात्मक
थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
मराठीप्रेमीजानेवारी २९, २०२१0 टिप्पण्या
1001marathiessay.blogspot.com
भारत देशामध्ये भौगोलिक दृष्ट्या फारच विविधता आढळून येते. या भौगोलिक विविधतेमुळे सामाजिक विविधता देखील आढळून येते.विविध प्रकारचे सर उत्सव आपल्या देशांमध्ये साजरे केले जातात. ह्या उत्सवांची रचनादेखील ऋतुमानानुसार केलेली आहे. असाच थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये मी आजोळी गेलो असताना मला एक फार चांगला अनुभव आला. तोच अनुभव मी आता तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघुया एक छानसा निबंध थंडीच्या दिवसातील सकाळ , किंवा हिवाळ्यातील एक रम्य सकाळ हा छानसा मराठी निबंध.
थंडीचे दिवस - winter season
थंडीतील सकाळ मराठी निबंध
डिसेंबर महिना संपत आलेला होता. नाताळाच्या शाळेला तीन-चार दिवस सुट्ट्या लागल्या होत्या. आम्ही सर्वांनी मिळून आजोळी जाण्याचे ठरवले. 23 तारखेला सकाळीच लवकर उठून आम्ही आवरून घेतले. आजोळी जाण्याची सर्व तयारी करून गाडीत सामान ठेवला आणि निघालो.
कडाक्याची थंडी पडलेली होती. हे सर्वांनी चांगले जाडजूड स्वेटर घातलेले होते. तरीदेखील गाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी वाजत होती. थंडीने माझे दात कडकड वाजत होते. अंगावर थंडीमुळे काटे आलेले होते.
गुलाबी थंडीचे काटे -winter season
अखेर थंडी सहन न झाल्यामुळे आम्ही एका ठिकाणी गाडी थांबवली आणि छान पैकी चहा पिला .चहा पिल्यानंतर थोडीशी मिळाली मग सर्वांना बरे वाटू लागले .दीड ते दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या आजोळी म्हणजेच पिंपळनेरला पोहोचलो.
हिवाळा मराठी निबंध
पिंपळनेरला एक फार मोठे धरण असल्यामुळे इथे थंडीचे प्रमाण अजूनच जास्त असते. आजोळी पोहोचल्याबरोबरच आजीने अंगात उष्णता निर्माण व्हावी म्हणून खारीक खोबर्याचे लाडू आम्हाला खायला दिले. आम्ही लाडवावर चांगला मनमुराद ताव मारला. आजी आणि आजोबा बरोबर खूप गप्पा मारल्या. दिवसभर खूप मजा केली.
एक रम्य सकाळ
रात्री शांततेत झोपी गेल्यानंतर दिवसभराचा सगळा थकवा निघून गेला.
सकाळी सगळी मंडळी झोपलेली होते. मला अचानक कसल्यातरी आवाजामुळे जाग आली.मी आवाजाच्या दिशेने बघीतले तर आजोबांनी दार उघडले होते. मी आजोबांना सांगितले," आजोबा कुठे जात आहात?" आजोबा फिरायला जात होते मी हि त्यांच्याबरोबर फिरायला जाण्याचा हट्ट केला. घाईघाईने तोंडावर पाणी मारले. चूळ भरली. आजोबांचा हात धरुन माझी स्वारी निघाली.
एक शांत सुंदर सकाळ
बाबा आणि मी घरातून बाहेर पडलो आणि थंडीचा जोर लगेच समजला. आजोबांबरोबर फिरायला जाणे हा एक मजेशीर अनुभव होता. दिवसभर गोंधळ असणारे रस्ते आईच्या कुशीत निजलेल्या बाळासारखे शांत दिसत होते.
गावातून बाहेर आल्यानंतर आम्ही शेताच्या दिशेने निघालो. शेताचा रस्ता थोडा अरुंद होता रस्त्याच्या दोन्ही बाजूने काही काटेरी झुडपे उगवलेली होती. मधेच अचानक झुडूपांमधून कसला तरी आवाज यायचा. नाक तोंडामधून वाफ येत होती. या गोष्टीची मला फार मजा वाटली. मी तोंडाने असे अनेक झुरके काढत पुढे चालले होते.
सगळीकडे धुके पसरलेले होते. धुक्याची चादर पांघरून सर्व निसर्ग शांत झोप घेत आहे असे वाटत होते. आमच्या या पावलांचा आवाज मात्र स्पष्ट येत होता. आवाजच फक्त निसर्गाची शांतता भंग करत होता.
शेतात पोचल्यावर आजोबांनी मोटर चालू केले शेतात पाणी जाऊ लागले.इतर वेळेला मला पाण्यात खेळायला भरपूर आवडते परंतु थंडी होते की समोर इतके पाणी दिसत असूनही माझे पाण्यात जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती.
पाणी खळखळ आवाज करून पिकांमधून फिरत होते. कुठून तरी अचानक चिमण्यांचा आवाज येऊ लागलेला होता. मी मनात म्हटले चला आपल्या जोडीला आता पक्षीही आलेले आहेत.
पूर्वेकडे हळूहळू उजेड दिसू लागलेला होता. वर क्षितिजावरती फिकट पिवळा पिवळा आणि केसरी रंगाचा सडा टाकलेला दिसू लागला होता. आता सूर्योदय होणार हे माझ्या लक्षात आले होते.
पक्ष्यांची किलबिल वाढू लागलेली होती. सूर्याची थोडीशी कडा दिसून छान पैकी चमकत होते. सूर्य डोकावून पाहतो आहे असे वाटत होते. हळूहळू छान पैकी वर आला. थोडीशी ऊब जाणवू लागली. गारठलेल्या सृष्टीला सूर्य जणू आपल्या उपदार बाहुंनी कवेत घेत आहे असा अनुभव येत होता.
आजोबा कामात मग्न होते. सूर्यप्रकाश माझ्या अंगावर घेण्यासाठी मी एका उंच दगडावर जाऊन बसले. उन्हाळ्यामध्ये नकोनकोसा वाट करणारा सूर्याचा प्रकाश आता मात्र हवाहवासा वाटत होता. खरोखर निसर्ग अगाध आहे. त्याची लीला त्यालाच समजते आपण फक्त त्याचा आनंद घ्यायचा एवढे मला तो क्षण समजावून सांगत होता.
पानांवर पडलेले दवबिंदू छान चमकत होते. एका दवबिंदू च्या प्रकाशाकडे लक्ष गेले की अचानक दुसरीकडून प्रकाश डोळ्यांवर यायचा. ते सारे दवबिंदू आणि सूर्यप्रकाश मिळून माझ्याबरोबर पकडापकडीचा खेळ खेळत होते. एखाद्या दवबिंदू ला पकडावे म्हणून मी त्या जवळ गेली, माझा पाय चिखलामध्ये भरला. मग मी तसंच पाण्यात खेळायला सुरुवात केली. थंडी वाजत होती पण सूर्यप्रकाशामुळे थोडी ऊबही मिळत होती.
पक्षीही इकडे तिकडे उडत होते. त्यांचे थवे बघून निसर्गाचे नक्षीकाम दिसत होते. मुख्य पक्षी थव्यापुढे असायचा आणि बाकीचे पक्षी त्याच्या मागे एका विशिष्ट लयीत असायचे.
धूक्याची चादर आता थोडीशी विरळ झालेली होती आणि सर्वत्र स्पष्ट दिसू लागलेले होत. थंडी आणि उभय यांचा एक अनोखा खेळ अनुभवायला मिळत होता. अंगावर आलेल्या काट्यांवर हात फिरवून थंडीची तीव्रता जाणवत होती. हाताचे तळवे एकमेकांवर जोरात घासून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू होता.
तितक्यात आजोबांचा आवाज आला आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो परंतु ही सुंदर थंडीतील सकाळ आणि या थंडीतील पहाटचा अनुभव नेहमीच माझ्या स्मरणात राहील.
Explanation: