History, asked by anju4044, 10 months ago

write the information about आर्तवचक्र/ऋतुचक्र (Menstrual cycle) in marathi​

Answers

Answered by xShreex
2

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28-30 दिवसाच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तवचक्र/ऋतुचक्र म्हणतात. आर्तवचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून चार संप्रेरकाद्वारे तिचे नियंत्रण होते. पुटीका ग्रंथी संप्रेरक (Follicle Stimulating Hor- mone), ल्युटीनायझींग संप्रेरक (पितपिंडकारी संप्रेरक / Luteinizing Hormone), इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही ती चार संप्रेरके होत. पुटीका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटीकापैकी एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीचा (डिंबपेशीचा /Oocyte) विकास होण्यास सुरूवात होते. ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन' संप्रेरक स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ (पहिल्या ऋतुचक्रावेळी) किंवा पुनर्निमिती (नंतरच्या सर्व ऋतुचक्रांवेळी) होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची (Follicle) पूर्ण वाढ होते. पितपिंडकारी संप्रेरकाच्या (Luteinizing hormone) प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन (Ovulation) म्हणतात) अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पितपिंड (Corpus luteum) तयार होते. हे पितपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्त्रवण्यास सुरुवात करते) प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात होते व असे अंतःस्तर भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते.

Similar questions