Chemistry, asked by Anonymous, 11 months ago

write the information onजैवतंत्रज्ञान (Biotechnology)in marathi​

Answers

Answered by saurabhshekade
1

Here is your answer

tick as brainlist

Explanation:

सूक्ष्मजीवांचा किंवा पेशीघटकांचा मनुष्याच्या आणि इतर सजीवांच्या वापरासाठी करण्याकरिता नवीन पदार्थ किंवा प्रक्रिया शोधण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान म्हणतात. इ.स.पू. ४००० वर्षांपूर्वीपासून द्राक्षापासून मदय तयार करणे, दुधापासून दही व चीज तयार करणे तसेच किण्वन प्रक्रियेने पाव, मळीपासून मद्य आणि शिर्का तयार करण्याची कला मानवाने अवगत केली होती. तेव्हापासून ते आधुनिक काळात प्रतिजैविके तयार करण्याच्या कामात जैवतंत्रज्ञानाचा वापर होत आलेला आहे. एकोणिसाव्या शतकात कार्ल एरेकी याने अशा क्रियांसाठी जैवतंत्रज्ञान ही संज्ञा प्रथम वापरली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज विस्तारले. सूक्ष्मजीवांमार्फत जे पदार्थ एरव्ही तयार केले गेले नसते असे पदार्थ जैवतंत्रज्ञानात, जनुक अभियांत्रिकीच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. जैवतंत्रज्ञानात अनेक विज्ञान शाखांचा समावेश झालेला आहे. कृषी, वैदयक, जनुकविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणिविज्ञान, संगणकविज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी.

जैवतंत्रज्ञानाचे चार मुख्य पैलू :

नील जैवतंत्रज्ञान : यात खाऱ्या व गोडया पाण्यांतील सजीवांचा वापर करून उत्पादिते तयार करतात.

हर‍ित जैवतंत्रज्ञान

हरित जैवतंत्रज्ञान : या तंत्रात कृषिविषयक प्रक्रियांचा समावेश होतो. (१) वन्य वनस्पतींची निवड करून ऊतिसंवर्धन तंत्राने त्यांचा मनुष्यासाठी वापर करणे, आणि (२) जनुक परिवर्तित वनस्पतींची/पिकांची निर्मिती करून विशिष्ट पर्यावरणात, जैवरसायनांच्या सान्निध्यात किंवा अनुपस्थितीत त्यांची वाढ करणे आणि त्याद्वारे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणे. उदा. कीटनाशकरोधी वनस्पती/पिके तयार करणे, जेणेकरून घातक कीटकनाशकांचा वापर करावा लागणार नाही. जसे, बीटी कापूस, बीटी मका वगैरे.

तांबडे जैवतंत्रज्ञान : यात वैदयकीय प्रक्रियांचा समावेश होतो. सूक्ष्मजीवांची रचना व विकास करून प्रतिजैविके, लशी तयार करणे, परिवर्तित सजीवांचा वापर करून त्यांचा जनुकीय आराखडा बदलून रोगांना आळा घालणे आणि रोगप्रतिकारक्षमता सक्षम करणे इत्यादी बाबी यात मोडतात.

श्वेत जैवतंत्रज्ञान : यात औदयोगिक प्रक्रियांचा समावेश होत असून त्याला औदयोगिक तंत्रज्ञान असेही म्हणतात. उपयुक्त व मौल्यवान रसायने तयार करू शकणाऱ्या सजीवांची रचना व विकास करणे, विकरांसारख्या उत्प्रेरकांचा वापर करून उपयुक्त व महागडी रसायने तयार करणे किंवा विनाशी/प्रदूषणकारी रसायनांचा नाश करणे इत्यादी बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते. श्वेत जैवतंत्रज्ञानादवारे कमी साधनसंपत्ती खर्ची पडेल आणि मोठया प्रमाणावर औदयोगिक उत्पादन निर्मिती होईल या अपेक्षेतून सजीवांची निर्मिती केली जाते.

वैद्यकीय क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा वापर : औषधनिर्मिती, जनुकीय उपचार (रोगांवर उपचार करण्यासाठी डीएनएचा वापर करणे), जनुकीय चाचणी (जनुकीय विकार शोधणे), डीएनए मायक्रोॲरे चीपची निर्मिती करून एका वेळी लाखो रक्त चाचण्या करणे इत्यादींसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. पुनर्संयोजी डीएनए/आरएनए तंत्राने तात्काळ औषधे मिळविणे (तयार करणे) शक्य झाले आहे. एश्चेरिकिया कोलाय आणि किण्वसारख्या (यीस्टसारख्या) सूक्ष्मजीवांचा जनुकीय आराखडा बदलून इन्शुलिन व प्रतिजैविके निर्माण करणे आता सुलभ झाले आहे.

जैवतंत्रज्ञानामुळे वैदयकीय चिकित्सा सुलभ व सोपी झाली असून हिपॅटायटीस-बी, हिपॅटायटीस-सी, कर्करोग, संधिवात, हीमोफिलिया, हाडे जोडणे, बहुविध कर्कशीभवन आणि हृदयाशी निगडित अनेक रोगांबरोबर उपचार होत आहेत. आज अस्तित्वात असलेल्या अनेक औषधांचे उत्पादन जैवतंत्रज्ञानामुळे सहज आणि अल्प किंमतीत करता येते. जनुकांची चाचणी करून कोणत्या जनुकात दोष आहे किंवा व्यंग आहे, ते शोधून त्याजागी नवीन जनुक बदलणे आता शक्य होत आहे. त्यामुळे कर्करोग व एड्स यांसारखे घातक रोग आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जैवतंत्रज्ञानाचे क्षितिज रुंदावत असून सखोल अभ्यास करण्यासाठी आता जैव अभियांत्रिकी ही जीवविज्ञानाची शाखा सुरू झाली आहे. या शाखेत जैवरसायन अभियांत्रिकी, जैववैदयक अभियांत्रिकी अशा उपशाखांचा अभ्यास केला जातो. प्रयोगशाळेत व व्यापारी तत्त्वावर उत्पादन करण्यासाठी या जैव अभियांत्रिकी शाखांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.

Answered by xShreex
0

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

मानवी फायदयाच्या दृष्टीने सजीवामध्ये कृत्रिमरीत्या जनकीय बटल व संकर घडवन सधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान से म्हणतात हे आपण मागील इयत्तेत पाहिले. जैवतमा तत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र. सक्ष्मजीवशास्त्र जैव रसायनशास्त्र दीयजीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञाना का या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश होतो. मुख्यत्वेकरून शेती व निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झाली आहे. शेतीमधन वाढीव उत्पन्न यावे यासाठी नवनवीन प्रयाग कल जात आहेत. औषधशास्त्रात प्रतिजैविके, जीवनसत्त्वे आणि इन्सलिन सारख्या संप्रेरकांच्या उत्पादनासाठी प्रयोग यशस्वी बाले आहेत.ऊती सवधनाच्या माध्यमातून पिकांच्या विविध उच्च प्रतीच्या प्रजाती विकसित झालेल्या आहेत.

जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो.

1 सक्ष्मजीवाच्या विविध क्षमताचा वापर करणे. उदाहरणार्थ, दधाचे दही होणे, मळीपासून मदयनिर्मिती करणे इत्यादी. ,

2.पेशींच्या उत्पादनक्षमतेचा वापर करून घेणे. उदाहरणार्थ, बिशिष्ट पेशीदवारे प्रतिजैविके, लसी यांची निर्मिती इत्यादी.

3.डी.एन.ए , प्रथिने यांसारख्या जैवरेणूंचा मानवी फायद्यासाठी उपयोग करणे.

4. जनुकीय बदल (Genetic manipulation) घडवून आणून हव्या त्या गुणधर्मांच्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करणे. उदाहरणार्थ, जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांना मानवी वाढीची संप्रेरके (Hormones) निर्माण करण्यास भाग पाडणे.

5. गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये (Non-gene biotechnology) संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ उतीसंवर्धन, संकरित बियाण्यांची निर्मिती इत्यादी.

Similar questions