Social Sciences, asked by Anonymous, 11 months ago

write the पर्यावरण व परिसंस्था संबंध information in Marathi ​

Answers

Answered by xShreex
48

\huge\underline{\underline\mathtt{Answer:-}}

नैसर्गिक पर्यावरणात हवा, वातावरण, जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. यातील घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्यांचे परस्परसंबंध फार महत्त्वपूर्ण असतात. मानवनिर्मित नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडतच असतो. मूलत: पर्यावरणात दोन प्रमुख घटकाचा वेश होतो 1. जैविक घटक 2. अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास 'पारिस्थितिकी (Ecology) म्हणतात. पारिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते त्यास परिसंस्था (Ecosystem) असे म्हणतात.

पर्यावरणात अनेक परिसंस्थांचा समावेश होतो. काही परिसंस्थांचा अभ्यास आपण मागील इयत्तांमध्ये केलेला आहेच. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही एक परिसंस्थाच आहे, तर आपली पृथ्वी ही सर्वांत मोठी परिसंस्था आहे. थोडक्यात, एखादया निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक, तसेच त्यांच्यातील आंतरक्रिया, हे सर्व एकत्र येऊन परिसंस्था बनते.

Answered by fatema1236
8

hey mate heres ur answer

पर्यावरण(Environment) आणि परिसंस्था (Ecology & Ecosystem) हे विज्ञानाचे महत्त्वाचे विषय आहेत. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक मिळून, त्यांच्या आंतरक्रियेतून अशी परिसंस्था बनत असते. यालाच पर्यावरणीय जीवशास्त्र असेही संबोधतात. हे विषय आपण अभ्यासक्रमात शिकतो खरे, परंतु ते आकलन करून घेत नाही. त्यामुळे आपण मोठे झालो की त्याच पर्यावरण-परिसंस्थांचा नाश करू लागतो. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. आपण तो शासकीय आणि खासगी पातळीवर उत्साहाने साजरा करतो. निसर्गाची; जैविक आणि अजैविक संसाधनांची नासधूस मोठ्या प्रमाणावर आजही चालूच आहे, त्याचे काय?

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते. आपल्याला पोषक असे पर्यावरण तयार होते. मनुष्य पाषाणयुगात निसर्गाचे नियम पाळत होता. तेव्हा निसर्ग आणि पर्यावरण सुरक्षित होते. आज स्थिती अगदी विरोधाभासी झाली आहे. मानव सुशिक्षित झाला, बुद्धिवान झाला, परंतु केवळ मनुष्य जातीच्या स्वार्थाचा विचार केला. परिणामी जंगल, वन्यजीव कमी झाले. लाखो वर्षांपासून बनलेले पर्यावरण, हवामानात बदल झाला. नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली. हे असेच सुरू राहिले तर सजीवच काय मानवालाही पृथ्वीवर राहणे कठीण होईल.

आपण पर्यावरण संरक्षणाचा विचार करताना केवळ मानवाचा विचार करून चालत नाही. अन्य सजीवांचाही विचार करायला पाहिजे. तसेच अजैविक घटक- जसे भूमी, खनिजे, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश यांची पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण आणि सर्व सजीव हे विविध परिसंस्थांत जगत असतात. अजैविक आणि जैविक घटक, त्याची आंतर्क्रिया आणि एकमेकावरील अवलंबिता मिळून परिसंस्था तयार होते. समुद्र, नद्या, जंगल, जलाशये, वाळवंट, गवताळ प्रदेश, पर्वतीय प्रदेश इत्यादी परिसंस्था आहेत. अजैविक भूभागात ज्या विविध सजीव प्रजाती एकमेकांना सहकार्य आणि समायोजन करून राहतात, तिथे जैवविविधता वाढते. एक अन्नसाखळी तयार होते. प्रत्येक सजीवाला त्यांचे अन्न मिळते. तिथे एक व्यवस्था (परिसंस्था) तयार होते. ती एकमेकांवर अवलंबून असते. जसे तळे आहे तिथे सूक्ष्म जीव, कीटक, जल वनस्पती, बेडूक, मासे, पक्षी, साप राहतील. तिथे जलीय परिसंस्था तयार होईल. परंतु तापमान वाढले, प्रदूषण वाढले, लोकांनी पाणी काढले, गाळ वाढला, खाणी आल्या तर तेथील परिसंस्था नष्ट होईल. सर्व जीव नष्ट होतील किंवा काहींना तिथून जावे लागेल. पृथ्वी हीसुद्धा एक मोठी परिसंस्था आहे. अशीच स्थिती पृथ्वीवर सर्वत्र पहावयास मिळत आहे.

hope it helps u

mark as brainliesy dear

Similar questions