India Languages, asked by inamdarhabiba67, 11 months ago

writer letter in Marathi

please answer I will Mark as brainlist​

Attachments:

Answers

Answered by bhagyashripawar132
12

Answer:

दि.०७ जानेवारी २०२०

प्रति,

मा.वनाधिकारी,

वनविभाग जिल्हा परिषद, पालघर.

पालघर - ४०१४०४

विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.

महोदय,

पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेच्या परिसरात साजरा केला जाणार आहे. या वन महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत; त्यासाठी हे पत्र लिहीत आहे. तरी कृपया आपण खालील तपशील आम्हाला पुरवल्यास आभारी राहू...

(१) आपण कोणकोणत्या झाडांची रोपे लावण्यासाठी देऊ शकता ?

(२) साधारणत: शाळेला दोनशे रोपे हवी आहेत. इतकी रोपे आपण देऊ शकाल का ?

हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपली कृपाभिलाषी,

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी

Explanation:

I hope it may definitely help you...

...So..., mark me as brainlistAs per your PROMISE...!

Similar questions