योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.
Answers
Answer:
plz makr me brainlist
Explanation:
पाणी हे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी,
म्हणजेच आपल्या जीवनातील प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी पाणी आवश्यक असते. हे पाणी आपले बाह्यांग स्वच्छ करते, योगीपुरुषाच्या सहवासाने मात्र आपण अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ होतो. आपला सबाह्य विकास घडतो.
पाणी तहानलेल्याची तहान भागवते, त्याच्या जिभेला सुखवते, तर योगीपुरुष लोकांना आत्मानंद, स्वानंद मिळवून देतो. चिरकाल टिकणार्या, कधीही न संपणाऱ्या या आनंदाचा अनुभव योगीपुरुष सामान्य जीवांना मिळवून देतो.
पाणी पावसाच्या रूपाने आकाशातील ढगांतून खाली येते. त्यामुळे, शेते पिकवून पृथ्वीवरील जीवांना अन्नधान्य मिळते. त्याचप्रमाणे योगीपुरुष या इहलोकात जन्म घेऊन येथील लोकांचा उद्धार करतो.
अशाप्रकारे, पाणी व योगीपुरुष आपल्या अस्तित्वाने संपूर्ण जगाचे कल्याण करतात, इतरांच्या उपयोगीपडतात. त्यांचे संपूर्ण जीवन समाजकार्यालाच वाहिलेले असते.