Hindi, asked by vaibhavitamboli21, 6 hours ago

युग संगणकाचे निबंध मराठी

plz answer fast don't copy ​

Answers

Answered by mhatreyashraj7
3

Answer:

 ह्या लॉकडाउनच्या काळात माणसाला पूर्णवेळ मनोरंजन कोणी दिले असेल तर ते संगणकाने. कितीतरी कामे सोपी केली या संगणकाने. बँकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून लोकांना आपले सर्व व्यवहार ऑनलाइन करता आले. एकही असे काम नव्हते जिथे संगणकाचा वापर झाला नाही. अगदी किराणा विकत घेतल्यावर सुट्टे पैसे देण्याऐवजी ,एकतर अँप ने किंवा कार्ड ने पैसे देण्यात येतात. भाजीपाला सुद्धा अशाच प्रकारे घेता येतो. शिवाय ज्यांना अगदीच घराबाहेर पडता येत नव्हते, ते ऑनलाईन ऑर्डर देऊन भाजी किराणा मागवू शकत होते.

   खरंतर संगणकाला इंटरनेटची साथ मिळाली आणि खरी प्रगती झाली. लॉकडाऊन मुळे शाळा बंद पडल्या पण तिथेही संगणक देवासारखा धावून आला, असं बोललं तर चुकीचं होणार नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शिक्षकांनी संगणकाच्या मदतीने मुलांचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. माझ्या आईने तर इंटरनेट बघून बघून रोज आम्हाला नवनवीन पदार्थ खाऊ घातले.

  आर्थिक सामाजिक शैक्षणिक सर्वच क्षेत्रात या संगणकाने बाजी मारली आहे. त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत म्हणूनच आपण सर्वच संगणक प्रेमी झालेले आहोत. त्याची गती हे त्याचे मूळ वैशिष्ट्य म्हणता येईल. जे काम मनुष्य एका दिवसात करू शकतो तेच काम संगणक काही मिनिटांमध्ये पूर्ण करतो. संगणकाचा वेग मायक्रो सेकंद, नॅनो सेकंद तसेच पिसो सेकंद मध्ये मोजला जातो. तसेच संगणकाची स्मृती ही मानवाच्या स्मृती पेक्षा जास्त आहे. शिवाय दीर्घकाळ ही आहे. आपल्याला जर एकच काम रोज रोज करावे लागले तर आपण खूप कंटाळा करतो. पण संगणक मात्र कधीच कुठल्या कामाचा कंटाळा करत नाही. तो ती कामे कितीही वेळा पुन्हा पुन्हा करू शकतो.

  शिवाय आपण साठवून ठेवलेली माहिती कधीही व कुठेही आपल्याला ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात तो आपल्यासमोर आणू शकतो. हिशोब ठेवणे, पत्र लिहिणे, चित्र रंगविणे, गणना करणे, बँकेचे व्यवहार इतकेच काय तर या कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये रुग्णांना लांबून तपासणीत सुद्धा या संगणकाचा वापर झाला. महामारी च्या काळात सामाजिक अंतर राखून रुग्णांना उपचार करण्यासाठी संगणकाची मोलाची साथ मिळाली.

  गरीब – श्रीमंत सर्वच लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे संगणक. कुणाकडे लॅपटॉपच्या स्वरूपात, कुणाकडे मोबाईलचे स्वरूपात, तर कुणाकडे टॅब च्या स्वरूपात. सर्वत्र संगणकाचे जाळे पसरले आहे. म्हणून तर भारत सरकारने सुद्धा डिजिटल इंडिया ची मोहीम हाती घेतली आहे. संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून लोक त्यावर गेम खेळतात, गाणी ऐकतात, त्यामुळे लोकांना त्याचे व्यसन लागत आहे.

  पण शेवटी ‘’अति तेथे माती’’ जास्त वेळ संगणकासमोर बसल्यामुळे लोकांचे डोळे खराब होऊ लागले आहेत. तसेच सायबर क्राईम वाढू लागला आहे. लोकांची फसवणूक होत आहे. बँकांचा डेटा चोरीला गेल्यामुळे लोकांची फसवणूक होत आहे. वैयक्तिक आयुष्यात संगणकाचा उपयोग हा जितका फायदेशीर आहे,तितकाच तो हानिकारक आहे. परंतु तो अविभाज्य घटक आहे. म्हणूनच आजचे युग हे संगणकाचे युग मानले जाते.

Similar questions