'योग' साधनेमुळे आयुष्यात होणाऱ्या बदलांविषयी दोन मित्र/मैत्रीणी मध्ये होणारा संवाद लिहा. (६० ते ८० शब्दांत)
Answers
Answer: आंतरराष्ट्रीय योग दिवस रोजी संपूर्ण जगात साजरा होईल. जास्तीत जास्त लोकांनी योग करण्यास पसंती देऊन आपलं आयुष्य निरोगी बनवावं या उद्देशाने योग दिनाची स्थापना करण्यात आली. परंतु या वर्षीच्या योग दिनाची थीम आहे ती म्हणजे, ‘घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत योग करा’! खरं तर संपूर्ण जगावर आलेल्या करोना संक्रमणाच्या संकटामुळे यावर्षी सर्वांना घरी सुरक्षित राहूनच योग दिन साजरा करणे क्रमप्राप्त झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कडक आदेश आहेत की जास्त लोकांनी एकत्र येऊन कोणत्याही एका जागी गर्दी करु नये. यामुळे मंत्रालयाकडून सांगण्यात आलंय की घरीच राहून आपल्या कुटुंबीयांना देखील योग करण्यास प्रोत्साहन द्या. करोनामुळे गेल्या काही महिन्यांत सर्वच ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) सुरु असून यामुळे सर्वच लोकांमध्ये तणाव वाढताना दिसून येत आहे. तुम्ही मान्य करा अथवा नका करु, पण योग हे तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी मोलाची भूमिका निभावतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. तसेच योग केल्याने आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहते. तर मंडळी आज आम्ही तुम्हाला योग करण्याचे असे काही फायदे सांगणार आहोत जे ऐकल्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीच योग करण्यास नकार देणार नाही आणि दुर्लक्षही करणार नाही!