योग शिक्षण आणि आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारताचा निसर्गरम्य वातावरणात येतात आणि तुमच्या मध्ये हा पर्यटनाचा कोणता प्रकार आहे?
Answers
Short answer
पर्यटनाचे अनेक प्रकारांत वर्गीकरण करण्यात येते. यांतील प्रमुख तीन प्रकार –
ऐतिहासिक पर्यटन:
पर्यटन आणि इतिहास यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच जगभरातील पर्यटकांचा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढतच आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्यांनी निर्मिलेल्या वास्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांचे राजवाडे, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गाँधी, आचार्य विनोबा भावे यांसारख्या विभूतींचे आश्रम अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटक भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते.
भौगोलिक पर्यटन:
अभयारण्ये, समुद्रकिनारे, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतराजी व अभयारण्ये हे प्रत्येक देशाचे वैभव असते. निसर्गराजीत राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडतो.
निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यांसाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होय.
आंतरराष्ट्रीय पर्यटन:
आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयींमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्वसंमेलने, बैठका, व्यावसायिक कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळालेली आहे.
२. आंतरराष्ट्रीय पर्यटन:
अ. आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे देशाच्या सीमेपार केलेले पर्यटन. यामध्ये आपल्या देशाबाहेर प्रवास केला जात असल्याने पर्यटनाची व्याप्ती विस्तारते. त्यामुळे, हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे.
ब. जहाज, रेल्वे आणि विमान यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन करणे हे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. जहाजांमुळे समुद्रकिनाऱ्यांवरचे देश जोडले गेले आहेत, तर रेल्वेमुळे युरोप जोडला गेला आहे. विमान वाहतुकीमुळे जग जवळ आले आहे.
क. आर्थिक उदारीकरणानंतर (१९९१ नंतर) भारतातून परदेशात जाणाऱ्यांची व परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. अभ्यास, विरंगुळा, स्थलदर्शन, व्यावसायिक कामे (बैठका, करारमदार इत्यादी.), चित्रपटांचे चित्रिकरण इत्यादी कामांसाठी देशविदेशांत ये-जा करणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे.
ड. आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी अधिकृत कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. उदा. पासपोर्ट व्हिसा इत्यादी.
Answer:
आरोग्य पर्यटन
हे बरोबर आहे का??