Science, asked by Savitarahane9, 2 months ago

योग्याचे गोड पण कोणाला संतुष्ट करते.​

Answers

Answered by loknadamjinaga1044
0

Answer:

नावांचा जन्म इ.स.१५२८मध्ये पुण्यपावन अशा घराण्यांत झाला.ज्यांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात परत आणली त्या संत भानुदासाचे एकनाथ हे पणतू होत.भगवद्भक्ती त्यांच्या घराण्यात पूर्वीपासून चालत आलेली.पैठण हे तत्कालीन महाराष्ट्राचे काशीक्षेत्र आणि संस्कृत धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे व्यासपीठ समजले जाई.या पैठणक्षेत्री एकनाथांचा जन्म झाला.नाथांच्या पिताजींचे नाव सूर्यनारायण तर आईचे नांव रुक्मिणी असे होते.पण आईवडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही.नाथांचे पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनीच केले.एकनाथांनी लहानपणी गीता,उपनिषदे,शास्त्रे,पुराणे या बरोबरच लेखन,वाचन,गणित यांचाही अभ्यास केला.बालवयात भक्तिमार्गाचे संस्कार नाथांवर झाले.त्यांचे मन परमार्थाकडे वळले, गुरूभेटीची ओढ निर्माण झाली.आजोबा चक्रपाणी यांची अनुज्ञा घेऊन एकनाथ देवगिरी येथील विद्वान संत जनार्दन स्वामी यांच्याकडे गेले.अत्यंत तेजस्वी व विनम्र अशा नाथांची योग्यता स्वामींनी ओळखली व एकनाथांना गुरूदीक्षा दिली,गुरू शिष्य तीर्थयात्रेला निघाले असतांना स्वामींनी नाथांना चतु:श्लोकी भागवतावर टीका लिहिण्याची आज्ञा केली त्या प्रमाणेनाथांनी पंचवटी आणि त्रंबकेश्वर येथील मुक्कामात भागवतावर विद्वत्तापूर्ण व रसाळ भाषेंत टीका पूर्ण केली.अष्टविनायक,बारा ज्योतिर्लिंग व ऊत्तर भारतातील तीर्थे करून नाथ पैठणला आले.

गुरूआज्ञेप्रमाणे नाथांनी सन १५५७मध्ये पैठण येथे गिरिजाबाईंशी विवाह केला.पतिव्रता गिरिजाबाई नाथांच्या जीवनांत पूर्ण समरस झाल्या.श्रीखंड्या व उध्दव हे दोन सेवक नाथांना लाभले.गोदा,लीला आणि हरिपंडित ही तीन अपत्ये,मुक्तेश्वर कवी,गोदावरीचा मुलगा.एकनाथांचा मुलगा हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी,कर्मठ,सनातनी वृत्तीचा होता.नाथ उदार व सहिष्णू होते.भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित रागावला व घर सोडून काशीला निघून गेला.नाथांच्या भागवतग्रंथाच्या मराठी टीकेचा काशीच्या पंडितांनी सन्मानाने गौरव केला तेव्हा हरिपंडिताला आपली चूक समजली,पितापुत्रामधील वाद कायमचा मिटला.

प्राकृतांत ग्रथरचना करण्याची ज्ञानेश्वरापासून चालत आलेली परंपरा नाथांनीही पुढे चालविली.नाथांनी आपले विचार व्यक्त करण्यासाठी विविध पध्दतीची योजना केली.पंडित आणि विद्वानांसाठी चतु:श्लोकी भागवत व एकनाथी भागवताचे लेखन केले.मध्यमवर्गासाठी ‘रुक्मिणी स्वयंवर व भावार्थरामायणाची योजना केली.जो तळाचा वर्ग होता,त्यासाठी भारूडाची निर्मिती केली.लोकभाषेंत लोकरंजन करताना लोकशिक्षण देणारे एकनाथ हे पहिले कवी होत.ग्रंथ,भारूडे,पदे,गौळणी आणि अभंग मिळून नाथांची काव्यसंपदा पाऊण लाख भरते.दत्तउपासक,आणि वारकरी,प्रपंच आणि परमार्थ,काव्य आणि तत्वज्ञान, संस्कृत आणि प्राकृत,पंडितश्रेष्ठ आणि सामान्यजन असा समन्वय नाथांनी आपल्या जीवनांत व धर्मग्रंथात घातला.

भागवतातील नवव्या अध्यायाच्या ३२ ते ३५ या चार श्लोकावर एकनाथांनी १०३६ओव्यांचे भाष्य लिहिले.सृष्टीनिर्मितीपूर्वीं ब्रह्मदेवाने केलेल्या तपश्चर्येने श्रीआदिनारायण प्रसन्न झाले व त्यांनी जे ज्ञान सांगितले ते या चार श्लोकात आले आहे.हा आपला पहिलाच ग्रंथ असल्याने ‘वाकुडे तिकुडे आर्ष‘आहेत असे नाथ संकोचाने व विनयाने सांगतात.“ग्रथाच्या शेवटी “जे बोलविले जनार्दने। तेचि ग्रंथकथने कथिलें म्यां।“या शब्दांत ग्रंथलेखनाचे सारे श्रेय नाथ आपले गुरू जनार्दन स्वामींना अर्पण करतात.

नाथांची भारूड रचना विविध स्वरुपाची असून त्यातून लोकजीवनातील उदाहरणे देऊन लोकभाषेतून अध्यात्म शिकवले आहे.मनोरंजनातून परमार्थाची भाषा शिकवली आहे.त्यामुळे नाथांचे वर्णन “लोकसाहित्यकार असे केले जाते.नाथकालीन समाजजीवननाचे म्हणजे चालीरिती, सणवार, कुटुंबव्यवस्था, ग्रामजीवन,समाजव्यवस्था यांचे अत्यंत स्पष्ट दर्शन ही भारूडे घडवतात.अशी सुमारे तीनशे भारूडे नाथांनी लिहिली आहेत.या शिवाय ‘हस्तामलक', ‘स्वात्मसुख’,‘शुकाष्टक’, ‘आनंदलहरी’, ‘गीतासार’,‘चिरंजीवपद’, ‘गीतामहिमा’अशी स्फुटप्रकरणे नाथांनी लिहिली आहेत.त्यातील ओव्यांची एकूण संख्या सुमारे ४०००आहे.

Similar questions