Geography, asked by sangitagarad972, 3 days ago

योग्य जोड्या लावा...
योग्य जोड्या लावा.
अ गट.
१. दिशादर्शक.
२. कर्कवृत्त.
३. ग्रिनीच रेखावृत्त.
४. 0° चे अक्षवृत्त
५. पूरतट

ब गट.
अ.२३ १/२ अंश उत्तर अक्षवृत्त.
ब. जागतिक प्रमाणवेळ
क.नदीचे संचयन कार्य
ड.दिशा ओळखण्यासाठी
ई.मकरवृत्त
फ.विषुववृत्त
Answer Please

Answers

Answered by dhanawadeparthmesh
87

Answer:

दिशादर्शक - दिशा ओळखण्यासाठी

कर्कवृत्त - .२३ १/२ अंश उत्तर अक्षवृत्त

ग्रिनीच रेखावृत्त - जागतिक प्रमाणवेळ

0° चे अक्षवृत्त - विषुववृत्त

पूरतट - नदीचे संचयन कार्य

Answered by rajraaz85
1

Answer:

१. दिशादर्शक: आपण समुद्रात, घनदाट जंगलात, विस्तीर्ण वाळवंटात प्रवास करत असताना आपल्याला सहजासहजी दिशा ओळखता येत नाहीत. त्यामुळे आपल्याला कुठल्या दिशेला जायचे आहे हे समजत नाही.

अशा ठिकाणी दिशा ओळखण्यासाठी आपण होकायंत्र म्हणजेच दिशादर्शकाचा उपयोग करतो. दिशादर्शक याला होकायंत्र किंवा कंपास असेसुद्धा म्हणतात. होकायंत्र आपल्याला उत्तर व दक्षिण दिशा दाखवते.

२. कर्कवृत्त: विषुववृत्तापासून उत्तरेला २३°३०' एवढ्या अंशावरून जाणाऱ्या अक्षवृत्तीय काल्पनिक रेषेला कर्कवृत्त असे म्हटले जाते. कर्कवृत्त हे विषुववृत्ताला समांतर असते. कर्कवृत्त हे भारताच्या आठ राज्यांमधून जाते.

३. ग्रीनिच रेखावृत्त: ०° अंशावरून जाणाऱ्या रेखावृत्ता ला ग्रीनिच रेखावृत्त असे म्हटले जाते.

हे रेखावृत्त ग्रीनिच या स्थानावरून जात असल्यामुळे या रेखावृत्त ला ग्रीनिच रेखावृत्त असे नाव पडले.

रेखावृत्ता नुसार जागतिक प्रमाण वेळ ठरवली जाते.

४. ०° चे अक्षवृत्त: पृथ्वी वरुन पूर्व-पश्चिम जाणाऱ्या अशा काल्पनिक रेषांना आपण अक्षवृत्त म्हणतो. उत्तर व दक्षिण ध्रुवापासून जवळपास सारख्या अंतरावर असलेल्या, पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या आडव्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. विषुववृत्ताला ०° अंश अक्षवृत्त असेसुद्धा म्हणतात.

५. पूरतट: नदीचे पाणी जेव्हा वाहत जाते तेव्हा ते स्वतःसोबत गाळ, मातीत, कचरा असे अनेक वस्तू वाहून नेते. नदीसोबत वाहून जाणारा गाळ हा नदीच्या किनाऱ्यांवर बाजूला होऊन साठत जातो.

आशा नियमित साठत जाणाऱ्या गाळामुळे नदीच्या काठांवर उंच बांध तयार होतात त्याला पूरतट असे म्हणतात. पूरतट निर्माण करणे हे एक प्रकारचे नदीचे संचयन कार्य समजले जाते.

Similar questions