...............यांना ' ध्वलक्रांतीचे प्रणेते ' मानतात.
Answers
Explanation:
भारताला दुग्ध उत्पादनात स्वयंपूर्ण बनविणार्या ‘ऑपरेशन फ्लड’ अर्थात श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांच्या निधनाने एका युगाचा अस्त झाला आहे. सहकार चळवळीला द्रष्टे नेतृत्व अन् त्यासोबत कुशल प्रशासकीय व्यवस्थापन लाभले असता काय चमत्कार होऊ शकतो हे गुजरातमधील ‘आणंद पॅटर्न’ने दाखवून दिले आहे. अर्थात याच्या यशामध्ये डॉ. कुरियन यांचा महत्वाचा वाटा आहे.
नियतीने एखाद्याच्या आयुष्यात घडवलेले चमत्कार हे एखाद्या राष्ट्राच्या भाग्याशी कसे निगडीत असतात हे डॉ. कुरियन यांच्या आयुष्यातील एका घटनेवरून दिसून येते. अत्यंत कुशाग्र बुध्दीच्या कुरियन यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते तेव्हा त्यांनी भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. याप्रसंगी झालेल्या मुलाखतीत एका परिक्षकाने त्यांना ‘पाश्चरीकरण म्हणजे काय?’ हा प्रश्न विचारला. यावर त्यांनी ‘ही प्रक्रिया म्हणजे दुधाचे निर्जंतुकीकरण करून त्याला दीर्घ काळापर्यंत टिकवणे’ असे अचूक उत्तर दिले. यामुळे कुरियन यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली. मात्र त्यांना एक अट टाकण्यात आली. या अंतर्गत त्यांना मिशिगन विद्यापीठात दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करावयाचा होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना शासकीय सेवेत रूजू व्हावे लागेल. त्यांनी भारतात परतल्यावर शासकीय सेवा न केल्यास दंड म्हणून ३० हजार रूपयांची परतफेड करण्याची अटही शिष्यवृत्तीच्या करारनाम्यात टाकण्यात आली होती. अर्थात त्या काळात ही रक्कम खूप मोठी असल्याने अमेरिकेतून पदवी मिळाल्यानंतर २८ वर्षांचा हा युवक गुजरातमधील आणंद येथे येऊन पोहचला.