India Languages, asked by deepkanair8, 8 months ago

यंत्राचे कर्तृत्व पाहिले, की मनुष्याचे मन थक्क होते खरे; पण हे कर्तृत्व दाखवणारी यंत्रे निर्माण करण्याचे सामर्थ
फक्त माणसात आहे, हे पुष्कळदा आपण विसरतो; म्हणून यांत्रिक युगाचे भव्य रूप पाहिले किंवा त्यात क्षणाक्षणाला
होणारी माणसांची धावपळ पाहिली, की मनुष्य सहज विचारतो, "यात माणसाचे स्थान कोणते?"
माणसाचे स्थान सर्वांत महत्त्वाचे आहे. आपल्या भोवताली जे काही दिसते, ते माणसाने निर्माण केले आहे. निसरी
जे दिले ते माणसाच्या हातांनी संदर केले. निसगनि दिलेल्या काळ्या जमिनीत माणसाने भरघोस पिके कालली. निखाने
दिलेल्या पाण्याच्या प्रवाहाचे मोठाले तलाव बांधले किंवा त्या पाण्यापासून वीज निर्माण केली. निसर्गाने दिलेल्या काळया
खडकांतून मने मोहून टाकणारी सुंदर, कोरीव लेणी खोदून काढली, जन्मभर कारखाने चालवून मला जर सर्वात महत्त्वाचे
तत्त्व काही पटले असेल, तर ते म्हणजे कुठल्याही कार्यात माणसाइतका महत्त्वाचा दुसरा घटक नसतो.
summary writing

Answers

Answered by mangeshkendre8649
11

सारूश लेखन

यंत्राचे कर्तृत्व पाहिले की आपले मन धक्क होते पण हे सर्व कर्तृत्व माणसाने निर्माण केले हे आपण विसरतो.म्हणून हे यांत्रिक युग पाहिले व या मागची माणसाची धावपळ त्याचे कार्य पाहिले की आपल्याला आश्चर्य वाटने काही नवीन नाही. निसर्गाने आपल्याला बुद्धी दिली त्याच बुद्धी चा वापर करून आपण पाण्यापासून वीज,शेतात पिके , मोठ्या दगडावर वेगवेगळी कलाकारी सादर केली अशी अनेक आश्चर्य वाटणारी कामे केली.हे फक्त माणूसच करू शकतो .अजून तरी मानसाशिवाय असा दुसरा घटक नाही ज्यांनी इतकी प्रगती केली असेल.

Similar questions