यादी तयार करा: पंचायत समितीची कामे.
Answers
पंचायत समितीची कामे
जिल्हा परिषदेकडे सोपविलेली कामे पंचायत समितीमार्फत करण्यात येतात. त्याशिवाय पुढील कामे पंचायत समिती स्वतंत्रपणे करू शकते.
शेतीची कामे
खरीप व रब्बी पिकांच्या मोहिमा
भातशेतीची प्रकर्षित लागवड
शेतीची अभिवृद्धी व सुधारणा
सुधारित कृषिपद्धती व कृती यांचे प्रात्याक्षिक करणे आणि आदर्श कृषिक्षेत्रे स्थापन करणे व ती सुस्थितीत ठेवणे.
सुधारित कृषिअवजारांचा प्रचार करणे
फळे व भाजीपाला यांच्या उत्पादनात वाढ करणे
गोदामे बांधणे व ती सुस्थितीत ठेवणे
रासायनिक खते, शेतीची अवजारे व शेतीसाठी लागणारे लोखंड, पोलाद व सिमेंट यांचे वाटप करणे
पीक स्पर्धा
सुधारीत बी-बियाणांची आयात व त्यांचे वितरण
पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे
गावातील पशुवैद्यकीय पेट्या
पशुवैद्यकीय साहाय्य केंद्रे
तालुका पशुधन सुधारणा संघ वगैरे स्थापन करणे
वैरण मुरवावयाचे खड़े
सुधारित पैदाशीच्या कोंबड्यांचे वितरण करणे सुधारित पैदाशीच्या मेंढ्यांचे वितरण करणे
गुरांची प्रदर्शने मेळावे भरविणे
दुग्धशाळा विकास
वने
गायराने व कुरणे (गवत सुधारणा धरून)
कुरण व जळण यांच्या प्रयोजनाकरिता गाव शिवारांच्या विकासासाठी उपाययोजना
समाजकल्याणाची कामे
मागासवर्गाचा आर्थिक विकास - यात पुढील बाबींचा समावेश होतो. शेतीची साधनसामग्री खरेदी करण्यासाठी शेतक-यास (कर्जाच्या व अर्थसहाय्याच्या रूपाने) वित्तीय सहाय्य देणे
विमुक्त जातींना चरखे पुरविणे
अस्पृश्यता निवारण - यात पुढील बाबींचा समावेश होतो.
हरिजन सप्ताह साजरे करणे
झुणका भाकर कार्यक्रम राबविणे
सवर्ण हिंदू व हरिजन यांच्यातील आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे.
मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम - यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.
महिलांच्या व बालकांच्या कल्याणाचे कार्यक्रम व प्रकल्प
बालवाड्यांची स्थापना करणे व त्या चालविणे
मागासवर्गाच्या कल्याणासाठी प्रचारांचे व प्रसिद्धीचे काम हाती घेणे
मागावर्गीयांसाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे
सामाजिक मेळावे भरविणे
मागासवर्गासाठी संस्कार केंद्रे, सामुहिक करमणुकीची केंद्रे आणि सामूहिक सभागृहे
विमुक्त जातींना कपडे पुरविणे औषधे खरेदी करण्यासाठी व्यक्तींना वित्तीय सहाय्य देणे व वैद्यकीय सहाय्य देण्यासाठी स्वेच्छा संस्थाना अनुदाने देणे
मागास्वर्गियांच्या व्यक्तींसाठी घरांची तरतूद करणे आणि
. पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची तरतूद करणे
शिक्षणाची कामे
प्राथमिक शाळांच्या इमारती बांधणे व त्या सुस्थितीत ठेवणे प्राथमिक शाळांसाठी साधनसामग्री व क्रीडांगणे यांची तरतूद करणे प्राथमिक शाळांचे व्यवस्थापन