या विजय/विजया सरनाईक विद्यार्थी नात्याने साप्ताहिकासाठी आपला लेख स्वीकारावा यासाठी विनंती करणारे पत्र संपादकांना लिहा.
Answers
Answer:
दिनांक: १९ एप्रिल २०१९
प्रति,
माननीय श्री. विनय गायकवाड संचालक, विनय अॅकॅडमी
२, सोमवार पेठ, कराड.
विषय: 'मराठी सुलेखन वर्गात प्रवेश मिळण्याबाबत. माननीय महोदय,
मी अ.ब.क, इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून विनय ॲकॅडमीतर्फे आयोजित मराठी सुलेखन वर्गात प्रशिक्षण घेण्यास इच्छुक आहे. मागच्या सुट्टीत मी आपले 'अ, आ, इ, ई' हे पुस्तक वाचून काढले. या पुस्तकात आपण सुलेखन कसे करावे याबद्दल सांगितले आहे, ते वाचून मी प्रेरित झालो.
'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' असे म्हटले जाते. मलाही माझे अक्षर सुव्यवस्थित, नीटनेटके व वळणदार करण्याची इच्छा आहे, म्हणून १ मे ते ३१ मे या कालावधीत चालणाऱ्या आपल्या सुलेखन प्रशिक्षण वर्गात मला प्रवेश घ्यायचा आहे; पण येथे सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या खूप असल्यामुळे मला प्रवेश मिळणे जरा कठीण झाले आहे.
एक प्रामाणिक व इच्छुक विद्यार्थी म्हणून आपण या वर्गात सहभागी करून घ्यावे ही नम्र विनंती.
मला प्रवेश द्यावा आणि आपल्या 'अक्षर' साधनेत
कळावे,
आपला विश्वासू
अ. ब. क.
३, साधना,
बुधवार पेठ, कराड.
पत्र लेखन
Explanation:
विजय सरनाईक,
लोक उदय हाईस्कूल,
टैगोरनगर,
सातारा.
दिनांक: १८ नोव्हेंबर, २०२१
प्रति,
माननीय संपादक,
जनमत,
सातारा.
विषय: साप्ताहिकासाठी आपला लेख स्वीकारावा यासाठी विनंती पत्र.
महोदय,
मी, विजय सरनाईक, लोक उदय हाईस्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहत आहे.या पत्रातून मी तुम्हाला तुमच्या साप्ताहिकामध्ये माझे लेख स्वीकारण्यासाठी विनंती करत आहे.
मी तुमचे साप्ताहिक नेहमी वाचतो. तुमच्या साप्ताहिकेमधील कविता, लेख व कथा मला फार आवडतात.
मी सुद्धा "कोरोना रोग" या विषयवार एक लेख लिहिले आहे. या पत्रासोबत मी हे लेख पाठवत आहे. मी विनंती करतो की तुम्ही तुमच्या साप्ताहिकेमध्ये माझे लेख छापावे.
तुमच्या साप्ताहिकेत माझे लेख छापून आल्यास मला खूप आनंद होईल. तसेच माझ्या लेखाबद्दल तुमचे मत कळवा, जेणेकरून मला योग्य मार्गदर्शन मिळेल.
मी आशा करतो की तुम्ही माझ्या लेखाबद्दल नक्की विचार कराल.
धन्यवाद.
आपला कृपाभिलाषी,
विजय सरनाईक.
(विद्यार्थी प्रतिनिधी)