India Languages, asked by dhyanajitenmehta, 10 months ago

yantra amcha Mitra ki Shatru essay in Marathi​

Answers

Answered by halamadrid
73

■■ यंत्र - मित्र की शत्रु■■

आपण जवळजवळ आपल्या प्रत्येक कामासाठी कोणते न कोणतेतरी यंत्र वापरत असतो.

यंत्रांचे अनेक फायदे आहेत.त्यांचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये आणि घरगुती कामांसाठी केला जातो.त्यांच्यामुळे आपल्या वेळेची बचत होते,आपल्याला एखादे काम करण्यासाठी कमी मेहनत करावी लागते.

यंत्रांमुळे कठीण कामसुद्धा सोप्या पद्धतिने करता येते,त्यामुळे मोठ्या प्रमाणात एखाद्या वस्तूचे उत्पादन करता येते.

पण, यंत्रांचे काही तोटे देखील आहेत.कामासाठी यंत्रांचा वापर केला जात असल्यामुळे,अकुशल कामगारांना नोकरी गमवायला लागते.यंत्रांवर कामासाठी अवलंबून असल्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम होत नाही.

यंत्रांवर अवलंबून राहिल्यामुळे आपण निसर्गाच्या आणि नातेवाईकांच्या सहवासात राहिल्या विसरलो आहोत.तसेच यंत्रांच्या अतिवाप्रामुळे पर्यावरण आणि प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

अशा प्रकारे, यंत्रांंचा चांगला उपयोग करून ते आपले मित्र आणि दुरुपयोग केल्यावर शत्रु ठरू शकतात.

Answered by mad210216
18

यंत्र- आमचा मित्र की शत्रु.

Explanation:

  • आताचे युग हे यंत्राचे युग आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध प्रकारच्या यंत्रांचे उपयोग करतो.
  • यंत्र आपली मदत एका मित्रासारखे करतात. त्यांच्यामुळे आपले जीवन आरामदायक व सोपे झाले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात नवनवीन प्रकारचे यंत्र वापरले जातात.
  • यंत्र आपल्या वेळेची बचत करतात. त्यांच्या मदतीने आपल्याला आपल्या कामात प्रगती ते.
  • परंतु, यंत्र जसे उपयोगी ठरतात, त्याचप्रकारे त्यांच्यामुळे नुकसान सुद्धा होते. यंत्रांचा अत्यधिक वापर केल्यामुळे आपल्या मानसिक व शारीरीक स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव होतो.
  • यंत्रांमुळे आपण समाज व आपल्या जवळच्या लोकांपासून लांब होत चाललो आहोत. काही लोक यंत्रांचा गैरवापर करून समाजात हिंसा, खोट्या बातम्या पसरवतात.
  • अशा प्रकारे, काही प्रसंगांमध्ये यंत्र आपले मित्र तर कधी आपले शत्रु बनू शकतात.

Similar questions