यता दहावी चा निरोप समारंभ बातमी लेखन
Answers
Answer:
विनायक पाचलग नामक. प्रायव्हेट हायस्कूल या वटवृक्षाच्या सावलीस आलेला एक छोटासा पक्षी आज निरोप देण्यास उभा आहे. आता इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची अवस्था ही सासरी जाणाऱ्या नववधूप्रमाणे झालेली आहे. प्रत्येकाची शरीरे जरी इथे असली तरी मने मात्र, जुन्या स्मृतींना जागे करण्यात गुंग झालेली आहेत. खरंच ! किती अविस्मरणीय होता हा प्रवास ! याच मूर्ती शाळेत पाचव्या इयत्तेत माझ्यासारख्या मातीच्या गोळयाचे आगमन झाले. या मातीच्या गोळयाला कधी प्रेमाचा स्पर्श देऊन तर कधी शिक्षेरूपी दिव्यात तावून सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! सुलाखून एका मूर्तीचे रूप दिले ते येथील शिक्षकांनी ! पाचवीपासून जशी माझी शारिरीक उंची वाढली तशी मानसिक उंचीही वाढली. माझ्या गुरूजनांनी फक्त अभ्यासातील विषयांशीच माझी मैत्री जमवली नाही तर, जगात कसे वागायचे, कसे जगायचे हे देखील शिकवले. अवघ्या सहा वर्षात या सुरवंटांचे रूपांतर फुलपाखरात झाले.
सुरवंटांचे झाले पाखरू, सर्वत्र लागले भराऱ्या मारू.
नवे जग, नव आशा, शोध घेण्याची जबर मनिषा ।
याच शाळेने लावले वळण, त्यांवर चढू यशाची चढण ॥
हे वळण लावण्यासाठी, गुरूजनांनी अविरत कष्ट घेतले. शिक्षकांनी आमच्या अज्ञानावर त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, संस्कृतीचा लेप दिला. मनाच्या कोऱ्या करकरीत पाटीवर समतेचे, ममतेचे धडे गिरविले. आणि आज ती पाटी ज्ञानरत्नांनी शिगोशिग भरलेली आहे. शिस्तीशिवाय आयुष्य म्हणजे होकायंत्राशिवाय जहाज ! म्हणूनच, आमच्या जीवनाचा कटीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाही डोस पाजला. हे सर्व करताना त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच मापात तोलले नाही. प्रत्येक दगडातील देव शोधून त्यांवर सद्विचारांचे घाव घातले. आणि त्या दगडाला ज्याच्या, त्याच्या गुणवैशिष्टयाप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर नटराजाच्या मुर्तीलाही आकार मिळाला. शाळेने फक्त हुशार विद्यार्थ्यांचीच रास निर्माण केली नाही, तर उत्कृष्ट कलाकार व उत्तमोत्तम खेळाडूही निर्माण केले.
माझ्या मनात आज रूंजी घालत आहेत ती शाळेतील व्याख्याने, नाटयवाचने, एकांकिका बसवणे, प्रदर्शनाचे तक्ते, वक्तृत्व स्पर्धा ते सत्कार. इतकेच काय, माझ्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे माझे गुरूजन. ते जिंकणे ………….. ते हरणे …….. ! व्यक्तीमत्वाला पैलू पडले ते इथेच. कांहीच घडण ….. कांहीच बिघडणं ………. सारंच निरूपद्रवी आणि सर्वांत शेवटी तथास्तु म्हणून दिलेला आदर्श विद्यार्थीरूपी आशिर्वाद !
शिक्षक दिनी मुख्याध्यापक होताना अवघ्या