Art, asked by vaibhavnile, 6 months ago

yuvak rastrachi sampati ​

Answers

Answered by bhoriasatbir
1

Answer:

What is this .

.

.

.

.

..

Samj nahi aya

Answered by s6a2365bharati00019
0

Answer:

वाऱ्याचा वेग ,सूर्याचे तेज, सागराची चंचलता व पहाडाची दिव्यता म्हणजे "युवा". जर जगातील सर्व संगणकांची बुद्धिमत्ता एकत्र केली व सर्व महायंत्रांची ताकद जमवली तरी ती युवांपुढे कमीच ! जेव्हा असे सर्व युवा एकत्र येतात तेव्हा तयार होते ती युवाशक्ती. युवाशक्तीची ताकद फार मोठी आहे म्हणूनच म्हणतात 'युवा शक्ति परा: शक्ति |

युवाशक्तीचे महत्व आपल्याला इतिहासातून समजतेच. स्वामी विवेकानंद यांनी दाखवून दिले आहे युवा हा कुठेच कमी नसतो अगदी तत्वज्ञान व अध्यात्मातही. कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाने धर्मसंकटात अडकलेल्या अर्जुनला खऱ्या धर्माचा अर्थ सांगितला. पर्यायाने संपूर्ण विश्वाला जीवनाच तत्वज्ञान सांगून मार्ग दाखविला. हा मार्ग दाखविणारा श्रीकृष्ण तरुणच होता व ते ऐकणाराही तरुणच. एक तरुण जर जगाला जीवनग्रंथ देऊ शकतो म्हणजे तो सर्वकाही करू शकतो.

काही वर्षांपूर्वी प. पू. पांडुरंगशाश्री आठवलेंनी युवाशक्तीची ताकद ओळखली होती म्हणूनच भगवान व श्रुती या बरोबरच युवकांवर विश्वास ठेवून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात वैचारीक क्रांती घडवली.

युवाशक्ति ही समाजप्रबोधन करुन समाजात क्रांती घडवू शकते .आता खरी गरज आहे ती युवशक्तिने एकत्र येण्याची .यामुळे आपला वैयक्तिक विकास तर निश्चितच आहे. याबरोबरच समाजप्रबोधन ही घडून येईल .समाजात तरुणांबद्दलची एक वेगळी ओळख व प्रतिमा निर्माण होईल. या सर्वासाठी येते ते युवाशक्तीचे संघटन ! आपण सर्वानी मिळून आपले संघटन केले तर काम निश्चितच सोपे होते . कारण-

"इरादे नेक हो तो रास्ते आसान होते है|

लगन सच्ची हो तो सपने भी साकार होते है|"

संघटनेचे महत्व तर आपण सर्वजण जाणून असतो. किंबहुना लहानपणापासून बोधकथांच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार केले जात असतात. कबुतराची गोष्ट आपल्याला माहितच असेल... एक शिकारी कबुतरांच्या संपूर्ण थव्यावर जाळे टाकून त्यांना अडकवतो . त्यावेळी सर्व कबुतर संपूर्ण ताकदिनीशी एकसाथ उडण्याचा प्रयत्न करतात व त्यात यशस्वी होतात.

थोडक्यात काय तर संघटन, एकी असेल तर असाध्य गोष्टी देखील जीवनातील आपण मिळून साध्य करू शकतो. समाजात आपल्याला कोणकोणते बदल करता येतील त्याचप्रमाणे नवीन काहीतरी आपण समाजात रुजवावे का?

यांसारख्या अनेक प्रश्नांवर आपण चर्चेच्या माध्यमातून एक ठराव करू शकतो व त्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करुन बदल घडवू शकतो. समाजातील तळागाळातील व्यक्तीला देखील पुढे येता येईल असा प्रयत्न युवाशक्ती करेल. आपल्या मनातील विचारांची स्वप्नपूर्ती आपण युवशक्तिनेच करू शकतो.

Similar questions