India Languages, asked by anushanadar811972, 1 year ago

Zadache mahatva in Marathi in short

Answers

Answered by WM394
42
झाडाचे महत्व
they are important in our life
Attachments:
Answered by fistshelter
22

Answer: झाड हे आपल्याला सावली देते.तसेच ऑक्सिजन देते. जमिनीची धूप रोखण्यास मदत करते.झाडाची सावली खूप दाट असते.तसेच खायला फळे देते. झाडाचे भरपूर प्रकार आहेत जसे की मोठे वृक्ष म्हटले की पिंपळ, वड. ही झाडे महत्त्वाची भूमिका निभवतात कारण झाडे नसली तर माणुस जगू शकत नाही.

झाडाचे प्रकार: १.औषधी २.फळ ३.फुले ४.वेली झाडा पासून शुद्ध हवा मिळते

जगभरात झाडांचे अनेक प्रकार आहेत .

झाडे आपल्या ला खूप प्रकारे मदत करतात.लोकांना झाडांचे महत्त्व नीट कळलेले नाही. फार पूर्वीचा संदर्भ द्यायचा झाला तर असे सांगता येईल की, झाडे आहेत म्हणून माणूस आहे. सुमारे चार अब्ज वर्षापूर्वी या पृथ्वीवर माणूस नव्हता. भरपूर पाणी होते आणि प्रचंड तापमान होते. माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो, तो पृथ्वीवर फार कमी होता आणि कार्बनवायू मोठ्या प्रमाणावर होता. तो कार्बन वायू झाडांनी शोषून घेतला आणि प्राणवायू सोडला. ही क्रिया माणसाच्या श्वसनक्रियेच्या नेमकी विरुद्ध आहे. माणूस प्राणवायू शोषून घेतो आणि कार्बन वायू सोडतो. झाडे कार्बन वायू शोषून घेतात आणि प्राणवायू सोडतात. कार्बन वायू प्रचंड असलेल्या वातावरणात प्रचंड संख्येने असलेल्या झाडांनी कार्बन वायू शोषून घेतला. त्यामुळे पृथ्वीचे वातावरण माणसाला जगण्यास अनुकूल झाले. थोडक्यात मानवाच्या जगण्याच्या क्रियेत झाडांचा मोठा वाटा आहे.

मात्र, मानवाने झाडे तोडायला सुरुवात केली आणि त्याचा वापर करू लागला. झाडांची लाकडे सरपण म्हणून वापरली. मात्र, त्यामुळे जंगलांची तोड झाली आणि पृथ्वीवरचे जंगलांचे प्रमाण घटले. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतियांश एवढे क्षेत्रफळ पाण्याने व्यापलेले आहे. उर्वरित जमिनीचा एक तृतियांश भाग जंगलांनी व्यापलेला असला पाहिजे, अन्यथा पृथ्वीचे पर्यावरण बिघडते, असा संकेत आहे. परंतु एवढी जंगले जतन करण्याचे तारतम्य माणसाला सुचलेले नाही. जंगले वेगाने कमी होत आहेत. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कार्बन वायू शोषून घेण्याची ही व्यवस्था नष्ट झाल्यामुळे हवेतले कार्बन वायूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट समोर आले आहे.

या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल तर जंगले टिकली पाहिजेत आणि वरचेवर झाडांची लागवड झाली पाहिजे. जंगल तोडीबरोबर ही औषधी झाडेही तोडली जात असतात आणि आपण औषधांना मुकत असतो. जंगलाची वाढ झाल्याने जंगलात वन्य पशू वावरू लागतात. दाट जंगले, त्यातले वन्य पशू, त्यातले काही पशू शाकाहारी तर काही पशू मांसाहारी हे सगळे एक वेगळे जग आहे. जंगलामध्ये ससे, हरीण असे शाकाहारी पशू खूप असतात. त्यांची पैदास वाढत गेली की, जंगले संकटात येतात. कारण हे छोटे छोटे शाकाहारी प्राणी वनस्पतींचे कोवळे कोंब खात असतात. हे कोंब एकदा खाल्ले की, झाड पूर्ण नष्ट होते. म्हणजे ज्या जंगलात ससे आणि हरणांची संख्या वाढते त्या जंगलांची वाढ खुंटत असते. अशा जंगलामध्ये वाघ, सिंह असे मांसाहारी प्राणी मोठ्या संख्येने असावे लागतात. ते असले की त्यांची गुजराण ससे आणि हरणांवर होत असल्यामुळे जंगलातील या तृणजीवी प्राण्यांची संख्या मर्यादित राहते आणि जंगलांची वाढ होते. म्हणजे जंगलांची चांगली वाढ होण्यासाठी झाडे न तोडणे, नवीन झाडे लावणे हे जसे आवश्यक आहे तसे वाघ, सिंह यांच्यासारखे हिंस्त्र मांसाहारी पशू जगणे हेही आवश्यक आहे. वृक्षतोडीविरोधात आणि वृक्ष लागवडीसाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणेही आवश्यक आहे.

Explanation:

Similar questions