1. बातमी लेखन:
तुमच्या शाळेत ऑनलाइन साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनाची बातमी तयार करून लिहा.
Answers
Answer:
मुंबई बोरिवली, 15 ऑगस्ट येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता झाली. मुंबई येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि लेखक श्री अण्णासाहेब पाटील (नाव काल्पनिक) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशभक्तीपर वेशभूषा स्पर्धेने वेधले.वेशभूषा स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसेनानी यांच्या वेशभूषा केल्या होत्या.
त्यानंतर यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आणि मुख्याध्यापक यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी चे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषणे दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीच्या विद्यार्थिनीने केले.
विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या द्वारे पुरस्कार व प्रशस्तीपत्रक वितरित करण्यात आले.
आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Explanation:
PLEASE MARK ME AS BRAINEST ANSWER