Political Science, asked by kumbhartushar800, 6 months ago

(1) एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला ' ------- ' असे म्हणतात. *

1 बहुपक्ष पद्धती

2 द्विपक्ष पद्धती

3 एकपक्ष पद्धती

4 यापैकी नाही

Answers

Answered by riyasurvhi
0

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीय पक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची ओळख करून घेणार आहोत.

तुमच्या शाळेत आणि परिसरात तुम्ही अनेक गट, संस्था अथवा संघटना कोणत्यातरी कामाचा पाठपुरावा करताना पाहिल्या असतील. सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेते. विविध चळवळींच्या आंदोलनाविषयीही तुम्ही वाचता. याच अर्थ असा की समाजात ज्याप्रकारे गट, संस्था, चळवळी सक्रिय असतात त्याचप्रकारे राजकीय पक्षही निवडणुका लढवण्यात पुढाकार घेताना दिसतात. समाजातील अन्य संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांच्यात फरक आहे. राजकीय पक्ष हेसुद्धा सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे व कार्यपद्धती मात्र वेगळी असते. या पार्श्वभूमीवर आपल्याला असे म्हणता येईल, की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी

जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना ‘राजकीय पक्ष’ म्हटले जाते. राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय.

Similar questions