1) हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूने व्यापलेला आहे.
Answers
Answered by
0
Answer:
नायट्रोजन.
वातावरणात असलेली हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे. हवेत असलेले वायू व त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे आहे.
हवेत सर्वात जास्त प्रमाणात असलेला वायू नायट्रोजन आहे. एकूण हवेच्या ७८% एवढे प्रमाण एकट्या नायट्रोजन या वायूचे आहे.
नायट्रोजन नंतर हवेत ऑक्सिजनचे प्रमाण २१ टक्के एवढे आढळते.
नायट्रोजन व ऑक्सिजन सोडून हवेत आरगॉन ०.९ %, कार्बन डाय-ऑक्साइड ०.०३% आणि आर्द्रता व इतर वायूंचे प्रमाण ०.०७% एवढे आढळते.
Similar questions