India Languages, asked by ojain206, 3 months ago

10 points on saint dnyaneshwar in marathi​

Answers

Answered by shraddha24780
1

Answer:

(भावार्थदीपिका या पानावरून पुनर्निर्देशित)

शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.

ज्ञानेश्वरीतील एक ओवी-मोडी लिपीत

सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंद बाबा

'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज.

'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ.

'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती.

'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव.

संशोधित प्रती

ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रामदास डांगे, पां.ना. कुलकर्णी ही त्यांतील संशोधकांची काही नावे. अशा विद्वानांच्या संशोधक वृत्तीतून ज्ञानेश्वरीच्या सुधारित प्रती तयार झाल्या

Similar questions