History, asked by Aarohishrma, 3 months ago

2) आत्मकथन
खालील घटक
तुमच्याशी बोलतो अशी कल्पना करून त्या घटकाचे आत्मकथन लिहा.
'मी मराठीचे पाठयपुस्तक​ plz help me plz

Answers

Answered by shreyashshinde5429
4

Explanation:

एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी - Pustakachi Atmakatha Essay in Marathi Language

खूप दिवसांपासून आपले मन कोणापुढे तरी मोकळे करावे, असे मला वाटत होते. आज बरे वाटते आहे कारण मला तुमच्यासारखी पुस्तकप्रेमी व्यक्ती भेटली आणि मनातल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली.

माझी जन्मकहाणी खूपच मनोरंजक आहे. आजपासून जवळपास पन्नास वर्षांपूर्वी मला लिहिण्यासाठी लेखकाने खूपच परिश्रम घेतले होते. त्यानंतर छपाईसाठी मला छापखान्यात पाठवले. छापखान्यात गेल्यावर अनेक वेगवेगळ्या प्रक्रियांतून मला जावे लागले; पण या सर्व प्रक्रियेमुळे मला एक देखणे रूप मिळाले. नंतर लवकरच माझी रवानगी एका पुस्तकविक्रेत्याच्या दुकानात झाली. काही दिवस मी येथे काचेच्या कपाटात ऐटित विराजमान झालो होतो. Read also : Guru Purnima Essay in Marathi

शेवटी एक दिवस मला त्या दुकानाचा निरोप घ्यावा लागला. वाचनाची आवड असणारा एक शाळेतील विदयार्थी आला. त्याने मला विकत घेतले

आणि त्याच्या घरी घेऊन गेला. दोन दिवसांतच त्याने मला खाकी रंगाचा पोशाख चढवला. माझ्या पहिल्याच पानावर त्याने आपले नाव वळणदार आणि सुवाच्य अक्षरांत लिहिले. काळजीपूर्वक माझे एक-एक पान उलटवून तो वाचत होता. वाचून झाल्यावर जागच्या जागी व्यवस्थित ठेवत होता. मी जोपर्यंत त्याच्याकडे होतो, तोपर्यंत तो अत्यंत काळजीपूर्वकरित्या मला हाताळत होता. Read also : माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

वाचताना मध्येच काही महत्त्वाचा मजकूर आहे, असे वाटल्यास पेन्सिलने अधोरेखनही करीत होता. मी खूप खूश होतो. तो आपल्य मित्रांमध्येसुद्धा माझे कौतुक करत होता. तो मित्रांना सांगत असे की, “या नव्या पुस्तकातून बरीच आवश्यक माहिती मला मिळाली. हे पुस्तक खूपच छान आहे. वक्तृत्त्व स्पर्धेची तयारी करण्यासाठी मला या पुस्तकाची खूप मदत झाली." हे जेव्हा तो सांगे, तेव्हा माझा ऊर समाधानाने भरून येई आणि माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मला वाटत असे. मी मनोमन खुश होतो.

एके दिवशी मात्र त्याच्या मित्राला माझी गरज असल्याने त्याने मला त्याच्या मित्राकडे पाठवले, तेव्हा मला थोडी भितीच वाटली होती. वाटले, आतापर्यत माझी काळजी जशी घेतली गेली, तशी हा सुद्धा घेईल का?

माझी ही भिती व्यर्थ ठरली. त्या मित्राने सुद्धा माझे मूल्य जाणले. माझी काळजी घेतली; पण दुर्दैवाने हे सुख फार काळ माझ्या नशीबी राहिले नाही. एके दिवशी, प्रवासात वाचत असताना हा मित्र मला बसमध्येच विसरून गेला.

मग मी एका अशिक्षित माणसाच्या हाती गेलो. त्याच्या लेखी माझे काहीच महत्त्व नव्हते, त्याने मला उचलले आणि घडी घालून आपल्या पिशवीत ठेवले. तेव्हा माझे अंग अगदी मोडून गेले. एका रद्दीच्या दुकानात नेऊन त्याने मला विकले. त्या रद्दीवाल्याने माझे मुखपृष्ठ फाडून वेगळे केले रंगीत चित्रे वेगळी केली. मला अतोनात दुःख झाले. Read also : परीक्षेच्या निकालाचा दिवस निबंध

ज्या अपेक्षेने, आनंदाने लेखकाच्या लेखणीतून मी साकार झालो, मला ज्या मुलाने विकत घेतले त्या मुलाने आणि त्याच्या मित्राने माझे मूल्य जाणून माझी जी काळजी घेतली, त्या सर्वांची आठवण मला आता शेवटच्या घटका मोजताना येत आहे. जन्मल्यापासून आताच्या घटकेपर्यंत अनेक सुखाचे अनुभव मी घेतले. तसेच दुःखाचेही घेतले. शेवटच्या अवस्थेत तुमच्यासारख्या दयाळू वाचकांमुळे माझे दुःख मी तुमच्याकडे मांडू शकलो, त्यामुळे आज शेवटच्या घटका मोजत असताना मला समाधान वाटत आहे

Similar questions