2) बातमी लेखन:
पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.
दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु - शिक्षणमंत्री.
Answers
दहावीची परीक्षा 29 एप्रिल पासून सुरु - शिक्षण मंत्री.
दिनांक 25 मार्च.
आमच्या वार्ताहराकडून...
मुंबई : कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल पासून सुरु होणार. परीक्षेच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल. सॅनिटायझर मास्टर व सोशल डिस्टन्स आवश्यक असणार आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात करावी असे आवाहन महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रातील दहावीच्या विद्यार्थ्यांची कोरणा मुळे लांबणीवर पडलेली एसएससी बोर्डाची परीक्षा येत्या 29 मार्च पासून सुरू होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. विद्यार्थ्यांच्या परीक्षा त्यांच्या शाळेची होणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. प्रॅक्टिकल परीक्षा होणार नसून विद्यार्थ्यांनी गृहपाठाच्या वह्या पूर्ण कराव्यात. 25 टक्के कमी झालेल्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या बोर्डाचे पेपर काढण्यात येतील.
त्यामुळेच विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरुवात करावी असे आवाहनही त्यांनी केले.