World Languages, asked by jeetjita49, 7 months ago

(2)* तुम्हाला आवडणाऱ्या कलेविषयी चार ते पाच ओळींत माहिती लिहा.
उत्तरः
12.​

Answers

Answered by rajraaz85
11

Answer:

कला म्हटले तर त्यात अनेक प्रकारच्या कला येतात. पण असे म्हणतात, की एक चित्र हजारो शब्दांपेक्षा जास्त माहिती देते. म्हणूनच मला लहानपणापासून एका कले बद्दल खूप आकर्षण आहे आणि ती कला म्हणजे चित्रकला. कुठल्याही  चित्राला पाहिल्यानंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या भावना निर्माण होत असतात. त्याचप्रमाणे अनेक प्रश्नही मनात उभे राहतात. चित्रकाराला ते चित्र काढत असताना काय म्हणायचे आहे?त्याच्या मनात काय चालले आहे? व तो काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्या चित्रात लपलेली असतात. चित्रकलेचे अनेक प्रकार असतात. चित्र हे वेगवेगळ्या पृष्ठभागांवर काढले जातात जसे जमिनीवर, कागदावर,भिंतींवर, पानांवर, कातळीवर, लाकडावर आणि कपड्यांवर. अगदी पुरातन काळापासून ही कला चालत आलेली आहे. सुरुवातीला माती पासून रंग बनवून चित्र काढले जायचे. त्यानंतर वनस्पतींपासून, पाल्यापासून, फुलांपासून अनेक नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा. आजही कित्येक वर्षापासून वापरण्यात आले रंग जसेच्या तसे आहेत. आधुनिक काळात बाजारात अनेक प्रकारचे रंग उपलब्ध झाले. चित्रकार चित्र काढतो त्यावेळेस तो आपल्या आतील भावना, विचार त्या कलेत उतरवतो आणि त्यामुळेच काही चित्रे आपल्या हृदयाला साद घालतात व कायमस्वरूपी लक्षात राहतात. म्हणून चित्रकला ही कला मला खूप आवडते.

Answered by kushpatel9823
0

Answer:

Explanation:

हृदयाला

Similar questions