2स्वमत:'सुंदर मी करणार' या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेलाअर्थ स्पष्ट करा.
Answers
Answer:
आनंदवनमध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले राहण्यासाठी झोपडया बांधणे, . अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उदयोग त्यांनी सुरूवात केले. अर्थात ही प्रक्रिया सोपी नव्हती. अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली ताट . मनाने जगण्याची प्रेरणा दिली आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून . | दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे देवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानानेच, आत्मविश्वासाचे होते.
बोटं झडलेल्या थिटया हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा लाभावा यासाठी 'आनंदवनाची' धडपड असते.
आनंदवन उभारताना बाबांनी अतोनात कष्ट घेतले. त्यामुळेच गेली दहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली जन्माला येताना उपेक्षा घेऊन आलेल्या जीवामध्ये 'सुंदर मी होणार यासोबत 'सुंदर मी करणार' हा मंत्र आनंदवनाने जोपासला.