3) ग्रिनिचच्या रेखावृत्ताची माहिती लिहा:
4)वृत्तजाळी म्हणजे काय?
Answers
Answer:
Explanation:पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत.
अक्षांशाप्रमाणे एका रेखांशाचेही साठ समान भाग करतात. त्या प्रत्येक भागाला एक मिनिट (') म्हणतात. एका मिनिटाचे साठ भाग केल्यास प्रत्येक भाग हा एक सेकंद (") मोजमापाचा होतो.
रेखावृत्तांमधील अंतर : विषुववृत्तावर (०° अक्षवृत्तावर) कोणत्याही ठिकाणी लगतच्या/ जवळच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १११ कि.मी (६० सागरी मैल-नाॅटिकल मैल) असते.
२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि.मी असते.
तसेच ६६°३०' उत्तर आणि ६६°३०' दक्षिण अक्षांशावर म्हणजेच आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्तावर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे ४४ कि.मी असते.
ध्रुवांवरती रेखावृत्ते मिळत असल्याने तेथे लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर ० कि.मी असते.
सर्व रेखावृत्ते समान लांबीची असतात.
Explanation:
ग्रिनिच्या रेखावृत्ताची माहिती