(3) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(कोणतेही दोन)
(i) मळमळ व्यक्त करणे.
Answers
Answered by
3
Answer:
मनातील दुःख व्यक्त करणे
Explanation:
वाक्यप्रचार -
वाक्यप्रचार हा एक शब्द समूह असतो. या शब्दसमूहाचा अर्थ एका विशिष्ट प्रकारे घेतला जातो. शब्दांचा अर्थ शब्दशहा न राहता तो बदलतो.
वाक्यात उपयोग -
- सईबाई माहेरला आल्यावर सासरला होत असणार्या अत्याचाराबद्दल तिने संपूर्ण मळमळ आपल्या घरच्यांसमोर व्यक्त केली.
- वसतिगृहात राहणाऱ्या अजयला आईवडिलांनी तिथल्या परिस्थिती बद्दल विचारल्यावर अजयने वर्षभरापासून होत असलेली मळमळ आई वडिलांसमोर व्यक्त केली.
- अनेक वर्षापासून आपल्या मालकाकडून होणारा अत्याचार सहन करत असताना आज अचानक कमला ने पोलिसांसमोर आपली मळमळ व्यक्त केली.
- शेतकऱ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांच्या दयनीय परिस्थितीबद्दल शेतकऱ्याने आपली मळमळ व्यक्त केली.
Similar questions