History, asked by sk7136656, 1 day ago

3) शिवाजी महाराजांनी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले.​

Answers

Answered by MizBroken
14

Answer:

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला.

♡──━━━━━━⊱✿⊰━━━━━━──♡

 \huge \pink{✿} \red {C} \green {u} \blue {t} \orange {e}  \pink {/} \red {Q} \blue {u} \pink {e} \red {e} \green {n} \pink {♡}

Answered by satvik6497
8

Answer:

अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते, राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.

Explanation:

BHAI ISME SE JO LIKHNA HO VO LIKH LENA

Similar questions