Hindi, asked by nonusingla8346, 16 hours ago

3) तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पहावी, या ओळीचा सरळ अर्थ लिहा​

Answers

Answered by bansodeajit100
3

Answer:

Explanation:

तुझ्या विजयाची दौड डोळे भरून पहावी, या ओळीचा सरळ अर्थ लिहा​

प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांनी ‘औक्षण’ या कवितेत सीमेवर लढण्यासाठी सज्ज झालेल्या जवानास ‘औक्षण’ करण्याची वेगळीच पद्धत सुचवली आहे.

युद्धभूमीतील बंदूकांना, तोफांना धैर्याने सामोरा जाणारा जवान पराक्रमी व जिद्दीचे पाऊल टाकणारा आहे. प्राणपणाने लढून तो विजयी होणार यात शंका नाही. ती विजयाची दौड कवयित्रीला आपल्या डोळ्यांनी पहायची आहे. डोळ्यातील आसवांनी अनेक ज्योती लावाव्या व त्याचे औक्षण करावे असे कवयित्रिला वाटते.

कवितेतून मिळणारा संदेश

देशाच्या सीमेचे रक्षण करणारे सैनिक नेहमीच देशासाठी भूषण असतात. जीवावर उदार होऊन ते सीमेवर न डगमगता उभे असतात. त्यांचे कुटुंब, मुले-बाळे यांना ते महिनोंमहिने भेटतही नाहीत. त्यांच्या देशरक्षणाच्या कर्तव्यामुळे देशातील नागरिक सुखाची झोप घेऊ शकतात. सण, उत्सव साजरे करू शकतात. अशा या सैनिकांच्या पाठिशी आपण भक्कपणे उभे राहिले पाहिजे. तसेच त्यांचा आदर, कौतुक करून त्यांच्या कार्याचा आपण नेहमीच अभिमान बाळगला पाहिजे, असा संदेश आपल्याला मिळतो.

Similar questions