History, asked by mahishsonar, 6 days ago

38 अफ्रिकेत कोणता मानव सापडलो ? in marathi​

Answers

Answered by AdityaBadone
0

Answer:

सरीसृपांचे युग अशी ओळख असलेल्या मेसोझोईक काळात म्हणजे सुमारे २५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आफ्रिकेत अवाढव्य आकाराच्या प्राण्यांचे अस्तित्व होते. डायनोसॉरचे जीवसृष्टीत प्राबल्य असलेला ज्युरासिक कालखंड याच युगाचा एक भाग होता. त्या काळातील प्राण्यांचे अवशेष आफ्रिकेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशामध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.[१]

आफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आफ्रिकेचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असे म्हटले जाते. आदिमानवाचा अर्थात होमो इरेक्टसच्या जीवनाचाही प्रारंभ १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतूनच झाला असे संशोधक मानतात. त्यानंतर आजच्या आधुनिक माणसाचा अर्थात होमो सपायन्सच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी याच खंडात झाला. येथून पुढच्या काळात उत्तरेला युरोप आणि पूर्वेला आशिया खंडात मानवी वस्ती विस्तारत गेली.

लिखित इतिहासानुसार, इजिप्तमध्ये इसवी सनापूर्वी ३३०० वर्षे आधीच्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. युरोपीयंच्या आफ्रिकेतील मोहिमांचा प्रारंभ ग्रीकांपासून झाला. अलेक्झांडर द ग्रेट याने इजिप्तचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. त्याने अलेक्झांड्रिया शहर ही वसवले.

इसवी सनाच्या सातव्या शतकापासून अरबस्थानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माचा प्रभाव इजिप्तपर्यंत आणि नंतर आफ्रिकेत दक्षिण बाजूला विस्तारत गेला. त्याने आफ्रिकेत नव्याच संस्कृतीची भर घातली. नवव्या शतकापासून युरोपीयांनी आफ्रिकेत जम बसवला.

गुलामगिरीच्या अमानवी प्रथेला आफ्रिकेत मोठा इतिहास आहे. खंडाच्या पूर्व भागात, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरूवातीपासून अरबांचा गुलाम व्यापार (अरब स्लाव्ह ट्रेड) चालत होता. सोळाव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून अटलांटिक स्लाव्ह ट्रेड चालला.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रिया इ.स. १९५३ मध्ये लिबियापासून सुरु झाली. इ.स. १९९३ पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.

Similar questions