4 sentences on tree in marathi
Answers
2. वृक्ष आम्हाला औषध देते.
3. झाड नैसर्गिक वायु शुद्धिकारक असतात आणि ते प्रदूषण नियंत्रित करून पर्यावरण वाचविण्यात मदत करतात.
4. झाडे माती बंधनकारक करून मातीची कचरा टाळतात.
Answer:
१.झाडे निसर्गाच्या सौंदर्यात भर घालतात.
झाडे निसर्गाचा एक महत्वपूर्ण घटक आहेत.त्यांचे हिरवेगार रंग,रंगीबेरंगी फुले प्रत्येकाचे मन मोहून घेतात.पावसाळ्यात तर त्यांचा रंग जास्त सुंदर दिसतो.त्यांच्या सानिध्यात राहून आपले मन शांत व प्रसन्न होते.ते उन्हाळ्यात सावली व पक्षींना आसरा देतात.
२.झाडे बहुउपयोगी असतात.
झाडांचा प्रत्येक भाग उपयोगी असतो.त्याच्या लाकडाने बऱ्याच वस्तू बनवल्या जातात.पान,फुले यांचा उपयोग सजावटीसाठी तसेच त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे ओषध बनवण्यात केला जातो.फळांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो.
३.झाडे आपल्यासाठी ऑक्सीजन प्रदान करतात.
झाडे आपल्याला श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेले ऑक्सीजन वातावरणात प्रदान करतात आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात.कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करून झाडे जागतिक तापमान वाढ कमी करण्यात मदत करतात. म्हणून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.
४. झाडे पाऊस आणण्यात मदत करतात.
झाडे बाष्पोत्सर्जन नावाच्या प्रक्रियेने त्यांच्या पानावर असलेल्या रंध्राने वातावरणात बाष्पेच्या स्वरूपात पाणी उत्सर्जित करतात.हे बाष्प वातावरणात वर जाते आणि पावसाचे ढग बनवून पाऊस पाडते.झाडांमुळे वातावरण थंड राहते.
Explanation: